Farmers Protest: पंजाबनंतर आता हरियाणाही टोल फ्री! किसान यूनियनने घेतला मोठा निर्णय

Farmers Protest Latest News : शेतकऱ्यांकडून मागील काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. दरम्यान आज शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय घेण्यात आले आहेत.
Farmers Protest latest update after punjab farmers announced toll free in Haryana tractor rally marathi news
Farmers Protest latest update after punjab farmers announced toll free in Haryana tractor rally marathi news
Updated on

Farmers Protest Latest News : शेतकऱ्यांकडून मागील काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. दरम्यान आज शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय घेण्यात आले आहेत.

दरम्यान भारतीय किसान युनियनने शेतकरी आंदोलन आणखी मजबूत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी गुरुवारी (15 फेब्रुवारी) घोषणा केली की उद्यापासून हरियाणालाही 3 तास ​​टोल फ्री केले जाईल.

तसेच 17 फेब्रुवारी रोजी भारतीय किसान युनियनतर्फे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. यासोबतच पश्चिम उत्तर प्रदेशात टोल फ्री करण्यासाठी शेतकरीही पुढे सरसावतील. आज कुरुक्षेत्रातील चढूनी गावात भारतीय किसान युनियनची बैठक झाली आणि त्यात हा निर्णय घेण्यात आला.

शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी माहिती दिली की, आज तीन निर्णय घेण्यात आले, पहिला निर्णय म्हणजे, उद्या दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत आम्ही हरियाणाला 3 तास टोल फ्री ठेवण्यात येईल. पंजाब आणि उत्तर प्रदेशातील आमचे जेथे यूनिट आहेत ते यामध्ये सहभागी होतील. त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक तहसीलमध्ये दुपारी 12 वाजल्यापासून ट्रॅक्टर परेड काढली जाईल. तहसीलमधील लोक ही कुठून कुठपर्यंत असेल याचा निर्णय घेतील.

Farmers Protest latest update after punjab farmers announced toll free in Haryana tractor rally marathi news
Maratha Reservation : विशेष अधिवेशनात कोणी विरोध करणार नाही, कारण...; मराठा आरक्षणावर भुजबळांचं मोठं वक्तव्य

त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 तारखेला सर्व शेतकरी आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची एक संयुक्त बैठक होणार आहे. त्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल. हरियाणामध्येच आंदोलन केलं जाईल. पंजाबमध्ये जाण्याचं काही कारण नाही असेही त्यांनी सांगितले.

सरकारशी चर्चेचा मार्ग खुला ठेवण्यासोबतच शेतकरी आंदोलन तीव्र केले जात आहे. आता हरियाणात टोल फ्री करण्याची घोषणा करण्यात आली आहे. किसान युनियनने यूपीसाठीही अशीच घोषणा केली आहे.

Farmers Protest latest update after punjab farmers announced toll free in Haryana tractor rally marathi news
Delhi Farmers Protest Updates: आंदोलनाचा तिसऱ्या दिवशी तोडगा निघणार? आज शेतकरी अन् मोदी सरकार यांच्यात चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.