गुजरातेत भडकणार शेतकरी आंदोलन ? 

 Farmer's strike in Gujarat?
Farmer's strike in Gujarat?
Updated on

अहमदाबाद : महाराष्ट्रानंतर आता गुजरातमध्येही शेतकरी आंदोलनाचा भडका उडण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्र किसान सभेचे नेते अशोक ढवळे हे गुजरातमध्ये डेरेदाखल झाले असून, उद्या (ता.1) पासून बहुतांश खेडी सरकारविरोधात असहकार आंदोलन पुकारणार आहेत. आजपासून खेड्यांतून शहरांना होणारा दूध, पालेभाज्या आणि कडधान्यांचा पुरवठा थांबविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. 

आज पत्रकारपरिषदेत बोलताना ढवळे म्हणाले की, ""केंद्राच्या बुलेट ट्रेनचा प्रकल्प आणि मुंबई-दिल्ली औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पासाठी भूसंपादन केले जात असताना शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळताना दिसत नाही. या प्रकल्पांमुळे गुजरातमधील शेतकऱ्यांना 34 टक्के जमीन गमवावी लागेल. या दोन्ही प्रकल्पांचा निषेध करण्यासाठी 3 जून रोजी महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आंदोलन होणार असून, पाच जून रोजी गुजरातमधील शेतकरी एल्गार करतील.''  

येत्या 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांतीदिनी अखिल भारतीय किसान महासभा केंद्र सरकारविरोधात देशव्यापी आंदोलन पुकारणार आहे. या वेळी सरकारला "छोडो भारत'चा इशारा देण्यात येईल. शेतीमालास रास्त भाव देण्याबरोबरच सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी. पंतप्रधान पीक विमा योजना ही कार्पोरेटचे भले करण्यासाठीच सुरू करण्यात आली आहे. 
अशोक ढवळे, किसान सभेचे नेते 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.