... तर शेतकऱ्यांवर होणार गुन्हा दाखल; योगी सरकारचा मोठा निर्णय

Farmers who leave cows homeless will be prosecuted
Farmers who leave cows homeless will be prosecutedFarmers who leave cows homeless will be prosecuted
Updated on

बेवारस प्राण्यांवर आळा घालण्यासाठी योगी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. दूध देणे बंद करणाऱ्या गायींना (cow) निराधार सोडणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यास सरकारने सांगितले आहे. अशा शेतकऱ्यांवर प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असे उत्तर प्रदेश (uttar pradesh) सरकारने सोमवारी सांगितले. (Farmers who leave cows homeless will be prosecuted)

कसाई आणि शेतकरी यांच्यात फरक आहे. आम्ही कसायाची नव्हे तर शेतकऱ्यांची काळजी घेऊ. प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत जनावरे सोडून देणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे पशुसंवर्धन मंत्री धरमपाल सिंग यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सपा आमदार अवधेश प्रसाद यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Farmers who leave cows homeless will be prosecuted
मोदी सरकारला ८ वर्षे झाल्यानिमित्त संमेलन; पंतप्रधान देणार ही भेट

प्रसाद यांनी सरकारला भटक्या प्राण्यांची समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्यामुळे मृत्यू झालेल्यांना नुकसान भरपाई या योजनेशी संबंधित प्रश्न विचारला होता. ही भटकी गुरे नाहीत. त्यांना सोडण्यात आले आहे. त्यांना कोणी सोडले हे सर्वांना माहीत आहे. जेव्हा गाय (cow) दूध देते तेव्हा ती ठेवली जाते आणि जेव्हा ती दूध देणे बंद करते तेव्हा ती सोडली जाते, असे उत्तर देताना धरमपाल सिंग म्हणाले.

६,१८७ गो निवारा केंद्रे सुरू

१५ मेपर्यंत राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात ६,१८७ गो निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी ८,३८,०१५ जनावरे ठेवण्यात आली आहेत, असे धरमपाल सिंग म्हणाले.

Farmers who leave cows homeless will be prosecuted
पोलिसांना पतीच्या हत्येवरच संशय; पत्नी अस्थिकलश घेऊन पोहोचली ठाण्यात

योगी सरकारने अवैध कत्तलखाने केले बंद

राज्यात (uttar pradesh) भटक्या जनावरांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी या समस्येला मोठा मुद्दा बनवला होता. निवडणुकीत भाजपचे नुकसान होण्याची भीती असताना राज्यात पुन्हा भाजपचे सरकार (Bjp) आल्यास ही समस्या दूर होईल, अशी घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक सभांमध्ये केली. २०१७ मध्ये सत्तेत आल्यानंतर योगी सरकारने अवैध कत्तलखाने बंद केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.