Fastag KYC Update Date : फास्टॅग बद्दल मोठी बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. नॅशनल अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) ने फास्टॅग केवायसी अपडेट करण्याची तारीख वाढवली आहे. NHAI ने फास्टॅग केवायसी अपडेट करण्यासाठी एक महिन्याचा वेळ वाढवून दिला आहे. यापूर्वी केवायसी पूर्ण करण्यासाठी अखेरची तारीख ३१ जानेवारी २०२४ देण्यात आली होती. आता ती वाढवून २९ फेब्रुवारी करण्यात आली आहे.
१५ जानेवारी रोजी NHAI ने बँकच्या अपूर्ण केवायसी असलेल्या फास्टॅगगला ३१ जानेवारी २०२४ नंतर निष्क्रीय केले जाईल असे सांगितले होते.
इलेक्ट्रॉनिक टोल संग्रह प्रणाली बद्दल दक्षता वाढवण्यासाठी तसेच टोल प्लाझावर वाहानांच्या सुरळीत वाहतूकीसाठी एनएचएआय ने एक वाहन एक फास्टॅग लागू करण्याचा निर्णय लागू केला आहे. याचा उद्देश अनेक वाहनासाठी एकच फास्टॅग वापरता यावा तसेच एखाद्या विशेष वाहनाला अनेक फास्टॅग जोडण्यापासून परावृत्त करणे हा आहे.
केवायसी कसे पूर्ण करणार?
तुम्ही https// fastag. ihmcl.com/ या वेबसाइटवर जा, त्यानंतर यामध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ओटीपीच्या मदतीने लॉगइन करा. यानंतर डॅशबोर्ट मेन्यू मध्ये माय प्रोफाइल ऑप्सनवर क्लिक करा. यामध्ये केवायसी सबसेक्शनमध्ये जा, येथे आवश्यक असलेल्या माहिती जसे की आयडी प्रूफ, एड्रेस प्रूफ आणि फोटो अपलोड करा. त्यानंतर सबमिट करा तुमची केवायसी पूर्ण होईल.
अॅप वापरून देखील करता येईल..
वाहन चालकाने ज्या कंपनीचा फास्टॅग घेतला आहे, त्याचे फास्टॅग वॉलेट अॅप आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करा त्यानंतर फास्टॅगमधअये मोबाईल नंबर वापरून लॉगइन करून माय प्रोफाइलमध्ये जा. येथे केवायसीवर क्लिक करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अशा प्रकारे केवायसी करु शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.