धक्कादायक! अल्पवयीन मुलगी मोबाईलवर जास्त वेळ घालवत असल्याच्या रागातून वडीलाने केला अनेकदा बलात्कार

आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Rape Case
Rape Caseटिम ई सकाळ
Updated on

देशात दर दिवशी बलात्काराच्या अनेक घटना उघडकीस येतात. मात्र आंध्रप्रदेशमध्ये एका अल्यवयीन मुलीवर तिच्या वडिलानेच वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलगी फोनवर जास्त वेळ घालवत असल्याच्या रागातून वडिलाने तिच्यावर बलात्कार केल्याचे तपासात समोर आले आहे.

Rape Case
'जन्मापूर्वीचा इतिहास शिवसेनेचे इतिहासाचार्य संजय राऊतांना माहिती नसावा'

आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीने तिच्या शिक्षिकेला तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविषयी सांगितले. शिक्षिकेने तिच्या वडीलांना शाळेत बोलावून विचारपुस केली. यावर तिच्या आरोपी वडीलाने माफी मागितली. त्यानंतर शिक्षिका आणि मुलीने आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपी वडीलाने तिच्यावर याआधी अनेकदा बलात्कार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी वडिलाला अटक केली असून या प्रकणाचा पोलीस सखोल तपास करीत आहे.

Rape Case
UP मध्ये काँग्रेसला धक्का! सिंधिया, जितीननंतर RPN सिंह यांचा राजीनामा

पिडीत अल्पवयीन मुलीची आई पाच महिन्यांपासून आजारी आहे. ती तीच्या माहेरी उपचार घेत आहे. दोन वर्षांपूर्वी आरोपी वडीलाची किडनी निकामी झाल्याने त्याच्या पत्नीने त्याला किडनी दान केली होती. पिडित मुलगी आणि आरोपी वडील घरी दोघेच राहायचे. पिडीत मुलगी तीच्या वडिलांची काळजी घेत होती. मात्र, ती मोबाईलवर जास्त वेळ घालवत असल्याने आरोपीने रागाच्या भरात तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप पिडीत अल्पवयीन मुलीने केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()