Crime News : स्वतःच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी नराधम बापाला पलवल येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत राणा यांच्या जलदगती न्यायालयाने फाशीची शिक्षा सिनावली आहे.
याच बरोबर पीडितेला जिल्हा प्राशासनातर्फे साडेसात लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
हरियाणा राज्यातील बहिन परिसरातील ही दुर्दैवी घटना घडली होती. 2 ऑक्टोबर 2020 रोजी महिला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी एका नराधम बापाने आपल्याच १७ वर्षीय मुलीवर सलग ३ वर्ष बलात्कार केला. असा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी नराधम बापा विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केले व बापाला अटक केली.न्यायालयाने नराधम बापाला फाशीची शिक्षा आणि १५ रुपयांचा दंड सुनावला.
गुन्हा दाखल करण्याच्या ४ वर्षापूर्वी मुलीच्या आईचे निधन झाले. त्यांनतर वर्षभरातच आपल्या मुलीवर बलात्कार करण्याचे त्या नराधमाने सुरूच ठेवले. विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नराधम बाप हा पेशाने हमाल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.