मुलाचा मोबाईल बंद पडला अन् बापानं थेट रेल्वे मंत्र्यांशीच संपर्क साधला

Indian Railway
Indian Railwayesakal
Updated on
Summary

आपण बऱ्याचदा ट्रेनमधून मुलं हरवल्याच्या अनेक घटना ऐकल्या आहेत; पण..

मंगळुरू (कर्नाटक) : आपण बऱ्याचदा ट्रेनमधून मुलं हरवल्याच्या अनेक घटना ऐकल्या आहेत. पण, एका ट्वीटनं बाप आणि मुलाची भेट घडवून दिल्याची घटना कधी ऐकलीय.. नाही ना? या प्रकरणात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मोठी भूमिका बजावलीय. एक 16 वर्षांचा मुलगा पहिल्यांदाच एकटा ट्रेननं प्रवास करत होता. पण, यादरम्यान त्याचा मोबाईल बंद पडतो. त्याच्या घरच्यांचा त्याच्याशी काहीच संपर्क होत नाही, त्याचे कुटुंबीय कासावीस होतात. त्यानंतर रेल्वे मंत्रालय त्या मुलाचा शोध घेण्याचा निर्णय घेतं.

कर्नाटक (Karnataka) राज्यातील मंगळुरुमधील (Mangalore) 16 वर्षीय शंतनू पहिल्यांदाच एकट्यानं कोट्टायम, केरळकडे प्रवास करण्याचा निर्णय घेतो. आई-वडिलांच्या परवानगीनं तो ट्रेनचा प्रवास सुरू करतो. शंतनूचे आई-वडीलही आनंदी असतात. कारण, आता त्यांचा मुलगा एकट्यानं प्रवास करत आहे म्हणून, तेही उत्साही असतात. ट्रेन निघते आणि 5 तासांनंतर मुलाचा फोन बंद पडतो.

शंतनूचे वडील किशन राव मुलाला फोन करतात, पण फोन लागत नाही. वारंवार फोन करुनही काहीच संपर्क होत नसल्यानं किशनराव घाबरतात आणि त्याला शोधण्यासाठी थेट रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnaw) यांना मदतीसाठी ट्वीट करतात. ट्वीट केल्यानंतर, अवघ्या 34 मिनिटांत किशन राव यांचा मोबाईलवर फोन येतो. फोनवर शंतनू बोलतो आणि ठीक असल्याचं सांगतो. त्याचा आवाज ऐकून किशनराव सुटकेचा नि:श्वास सोडतात. एका ट्वीटनं बाप आणि मुलाची भेट घडवून दिल्याची घटना मंगळुरुत घडलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.