Ram Mandir : "....तर त्यांनी पाकिस्तानात जावं"; अयोध्येतील उपस्थितीवरुन फतवा काढणाऱ्यांना मुस्लिम धर्मगुरूंनी सुनावलं

Fatwa Issued Against Imam : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावल्याने एका मुस्लिम धर्मगुरुंविरोधात फतवा जारी करण्यात आला आहे.
Fatwa Issued Against Imam
Fatwa Issued Against Imam
Updated on

Fatwa Issued Against Imam : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावल्याने एका मुस्लिम धर्मगुरुंविरोधात फतवा जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे चीफ डॉक्टर इमाम उमर अहमद इलियासी असे या धर्मगुरुंचे नाव आहे.

डॉक्टर इलियासी हे २२ जानेवारी रोजी पार पडलेल्या अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले होते. हा फतवा रविवारी जारी करण्यात आला आहे. त्यांना राम मंदिरातील कार्यक्रम पार पडल्यापासूनच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याची माहिती डॉक्टर इलियासी यांनी दिली.

डॉक्टर इमाम उमर अहमद इलियासी यांनी म्हणाले की, अयोध्येतून दिलेल्या संदेशात मी सांगितले होते की, आपले पूजा करण्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात. आपले धर्म वेगळे असू शकतात, मात्र आपण भारतात राहतो आणि आपण सगळे भारतीय आहोत. आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन भारताला मजबूत केले पाहिजे. हा संदेश व्हायरल झाला आणि सर्वांना इमाम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला गेल्याबद्दल माहिती झाली.

Fatwa Issued Against Imam
Maratha Reservation : नारायण राणेंची मराठा आरक्षणावरील पत्रकार परिषद रद्द; म्हणाले, पदापेक्षा जात, धर्म अन् देश...

आता रविवारी माझ्याविरोधात हा फतवा जारी करण्यात आला आहे. डॉक्टर इलियासी यांनी सांगितलं की, २२ जानेवारी रोजी संध्याकाळपासूनच माझ्या फोनवर वेगवेगळ्या ठिकाणांहून धमक्या दिल्या जात होत्या. मला आणि माझ्या कुटुंबियांबद्दल अपशब्द वापरले गेले. इतकेच नाही तर मला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे.

Fatwa Issued Against Imam
Lawrence Bishnoi Gang : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शूटरची हरियाणात निर्घृण हत्या; हातपाय बांधून पेटवलं

या प्रकरणावर भाष्य करताना डॉक्टर इलियासी म्हणले की, चीफ इमाम असल्याने मला राम मंदिर ट्रस्टकडून निमंत्रण मिळालं होतं. एएनआय या वृत्तसंस्थेला बोलताना त्यांनी सांगितलं की, मी यातील कोणालाही ओळखत नाही पण सोशल मीडियाच्या माध्यमातून मला देशभरातील विविध भागातील इमामांच्यावतीनं फतवे आले होते. यामध्ये माझा मोबाईल नंबरही या फतव्यात दिला आहे. त्यामुळं देशभरातून मला फोनवरुन धमक्या देखील आल्या आहेत. यामध्ये माझ्यावर बहिष्कार टाकण्यात आला आहे तसेच मला माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा त्याचे परिणाम भोगण्यास तयार राहा असंही म्हटलं आहे.

यामध्ये प्रामुख्यानं चार मुद्दे आहेत. एक तुम्ही प्राण प्रतिष्ठेला का गेले, तुम्ही मुख्य इमाम असल्यानं तुम्हाला तो अधिकारचं नाही. दुसरा मुद्दा असा आहे की, तुम्ही मानवतेला धर्मापेक्षा उच्च समजता हा तुमचा गुन्हा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की, देशाला तुम्ही धर्मापेक्षा वरचा दर्जा दिला आहे त्यामुळं तुमच्याविरोधात कुफ्त जाहीर करत आहोत.

पण मी त्यांना सांगू इच्छितो की हा इस्लामिक देश नाही हा भारत आहे. सनातन भारत आहे, इथं कायमंच सर्वधर्म समभावाची गोष्ट आहे. इथं अनेकतेत एकतेची गोष्ट आहे. त्यांना जर वाटतं असेल की, मी देशावर प्रेम करतो तर मला वाटतं की त्यांनी पाकिस्तानात जायला हवं. जे माझ्या विरोधात यासाठी द्वेष करत असतील तर त्यांनी देखील पाकिस्तानात जायला हवं, असंही इलियासी यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.