सरकारी कॉलेजप्रमाणे असणार खासगी मेडिकल कॉलेजचे शुल्क

याबाबत NMS ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत.
Doctors
Doctors sakal
Updated on

नवी दिल्ली - नॅशनल मेडिकल कमिशनने शनिवारी खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि डीम्ड विद्यापीठांमधील 50 टक्के जागांसाठी शुल्क आणि इतर सर्व शुल्क निश्चित करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या (Private Medical Colleges) 50 टक्के जागांचे शुल्क संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या बरोबरीचे असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत एएनआयने ट्वीट केले आहे.

खाजगी वैद्यकीय महाविद्यालये आणि डीम्ड विद्यापीठे (50 टक्के फी) डीम्ड युनिव्हर्सिटी फी मधील जागा त्या विशिष्ट राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या फीच्या बरोबरीची असावी, असे नॅशनल मेडिकल कमिशनच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. (NMS New Guidelines For Medical Seats )

Doctors
Updates : लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर; आशा भोसले यांची माहिती

विस्तृत चर्चेनंतर, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील शुल्क बरोबरीने असावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयाचा फायदा ज्या उमेदवारांनी सरकारी कोट्यातील जागांचा लाभ घेतला आहे अशा उमेदवारांना ही रचना प्रथम उपलब्ध करून दिली जाईल, परंतु संबंधित वैद्यकीय महाविद्यालय किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीच्या एकूण मंजूर संख्येच्या 50 टक्के मर्यादेपर्यंत मर्यादित असेल, असे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.