Uday Kotak: डॉलरला 'आर्थिक दहशतवादी' म्हटल्यानंतर उदय कोटक यांचा यू-टर्न; म्हणाले, जागतिक...

कोटक महिंद्रा बँकेचे प्रमोटर आणि प्रसिद्ध बँकर उदय कोटक यांनी डॉलरला 'आर्थिक दहशतवादी' संबोधले होते.
Uday Kotak
Uday KotakSakal
Updated on

Uday Kotak: कोटक महिंद्रा बँकेचे प्रमोटर आणि प्रसिद्ध बँकर उदय कोटक यांनी डॉलरला 'आर्थिक दहशतवादी' संबोधले होते. त्यांच्या एका वक्तव्यावर बराच गदारोळ झाला होता, त्यानंतर आता त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट केला आहे.

उदय कोटक यांनी रविवारी ट्विटरवर डॉलरला 'आर्थिक दहशतवादी' म्हणण्यामागील संपूर्ण कारण स्पष्ट केले. शुक्रवारी एका व्यावसायिक वृत्तपत्राशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी डॉलरबाबत हे विधान केले होते, ते सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते.

उदय कोटक यांनी अजाणतेपणे अमेरिकन डॉलरला 'आर्थिक दहशतवादी' म्हटले होते, असे स्पष्ट केले. आता त्यांना ते दुरुस्त केले आहे. हा शब्द रिझर्व्ह चलन म्हणून डॉलरची ताकद दाखवण्यासाठी वापरला जात असे. डॉलर जागतिक बाजारपेठेवर नियंत्रण ठेवताे. त्यामुळे हा शब्द वापरला असे ते म्हणाले.

उदय कोटक यांनी 'ईटी अवॉर्ड्स फॉर कॉर्पोरेट एक्सलन्स 2023' दरम्यान नॉस्ट्रो अकाउंट ऑपरेशन्समधील डॉलरची ताकद स्पष्ट केली.

ते म्हणाले होते की आमच्याकडे नॉस्ट्रो खात्यात जेवढे पैसे पडले आहेत, ते उद्या अमेरिकेत बसलेले कोणीतरी सांगू शकतात की तुम्ही ते दुसऱ्या दिवशीपासून वापरू शकणार नाहीत.

Uday Kotak
Adani Group: सेबीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर अदानी समूहाची प्रतिक्रिया; म्हणाले, मीडियाने...

उदय कोटक म्हणाले की, जग सध्या डॉलरला पर्यायी चलन शोधत आहे, ज्याचा वापर राखीव चलन म्हणून करता येईल. भारतीय रुपयासाठी ही एक विशेष संधी आहे. यासाठी भारताला मजबूत संस्था आणि चौकट तयार करावी लागेल, जी कोणत्याही बाह्य दबावापासून मुक्त असेल.

उदय कोटक कोटक महिंद्रा बँकेत परत आले आहेत. बँकेने त्यांना बिगर कार्यकारी संचालक करून संचालक मंडळात समाविष्ट केले आहे. उदय कोटक यांनी डिसेंबरमध्येच बँकेच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता.

कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य वित्त अधिकारी जैमिन भट यांनी उदय यांच्या परतीचा निर्णय कायदेशीर असल्याचे म्हटले आहे. यासोबतच बँकेच्या भागधारकांसाठी हा योग्य निर्णय असल्याचेही म्हटले आहे.

उदय यांच्या या नियुक्तीबाबत अनेक बाजूंनी प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यांच्या नियुक्तीला आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन म्हटले जात होते, कारण आरबीआयच्या 2021 च्या परिपत्रकानुसार बँकेच्या एमडी आणि सीईओच्या पुनर्नियुक्तीमध्ये तीन वर्षांचे अंतर असावे.

Uday Kotak
Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.