हसनपूरचे (hasanpur) आरजेडीचे (RJD) आमदार आणि लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांच्याविरुद्ध बुधवारी रोसडा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election) खोटे प्रतिज्ञापत्र (False affidavit) दाखल करून मालमत्तेचा तपशील लपवल्याचा (Alleged concealment of property) आरोप आहे. हसनपूर विधानसभेचे निवडणूक अधिकारी व प्रभारी उपजिल्हाधिकारी ब्रजेश कुमार यांच्या अर्जावर लोकप्रतिनिधी कायदा १९५१च्या कलम १२५A अंतर्गत रोसडा पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. (FIR against Tej Pratap Yadav)
तेज प्रताप यादव यांनी १३ ऑक्टोबर २०२० रोजी बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election) दुसऱ्या टप्प्यातील अधिसूचनेनुसार १४० हसनपूर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. नामांकनादरम्यान तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्थावर मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार (Alleged concealment of property) बिहार प्रदेश जनता दल यू ने मुख्य निवडणूक अधिकारी, बिहार यांच्याकडे केली होती.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ४ नोव्हेंबर २०२० रोजी या तक्रारीची प्रत भारतीय निवडणूक आयोगाला पाठवली होती. ज्यावर भारतीय निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीडीटी) चौकशीसाठी पत्र लिहिले आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सीबीडीटीने तीन पत्रांद्वारे सांगितले की, तेज प्रताप यादव यांनी २०१५ आणि २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Assembly Election) दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये (जंगम आणि स्थावर) मालमत्तेत ८२,४०,८६७ रुपयांची वाढ झाली आहे. २०१५-१६ ते २०१६-२० या आर्थिक वर्षातील आयकर रिटर्नमध्ये एकूण उत्पन्न २२,७६,२२० रुपये आहे.
या मालमत्तेची (Alleged concealment of property) नोंद उपनिबंधकांच्या रेकॉर्डमध्ये तेज प्रताप यादव यांच्या नावावर आहे. मात्र, तेज प्रताप यादव यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या मालमत्तेशी जुळत नाही. सीबीडीटीच्या चौकशी अहवालाच्या आधारे तेज प्रताप यादवला निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती. त्यांना नोटीस मिळाल्यापासून तीन आठवड्यांच्या आत उत्तर देण्यास सांगण्यात आले होते.
मात्र, तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांनी दिलेल्या मुदतीत प्रतिसाद दिला नाही. यामुळे जिल्हा निवडणूक अधिकारीसह जिल्हा दंडाधिकारी समस्तीपूर यांनी पत्र जारी केले आणि यादवाविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश हसनपूर विधानसभेचे निवडणूक अधिकारीसह प्रभारी डीसीएलआर उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.