Odisha Train Accident : रेल्वे दुर्घटनेसंबधी मोठी अपडेट! 'या' कलमांतर्गत FIR दाखल

Odisha Train Accident
Odisha Train Accident
Updated on

ओडिसाच्या बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मोठी अपडेट समोर आली आहे. शेकडो लोकांचा जीव घेणाऱ्या या अपघाताबद्दल आता अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कटक (Cuttack) येथील सरकारी रेल्वे पोलिसांनी (GRP) रेल्वे कायद्याच्या कलम १५३, १५४ आणि १७५ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. बालासोर जीआरपीएसचे एसआय पापू कुमार नाईक यांच्या तक्रारीनंतर एफआयआर नोंदवण्यात आला.

या एफआयआरमध्ये निष्काळजीपणामुळे मृत्यू आणि जीव धोक्यात घालण्याच्या आरोपाखाली अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या एफआयआरमध्ये एकाही आरोपीचे नाव देण्यात आलेले नाहीये.

Odisha Train Accident
Odisha Train Accident : निधी मिळाला, पण..; रेल्वेमार्गावर 'कवच' नसण्याचं धक्कादायक कारण आलं समोर

ओडिशातील मालगाडी, बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस या तीन गाड्यांचा समावेश असलेल्या ओडिशातील रेल्वे अपघाताची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी रेल्वे मंत्रालयाने रविवारी केली. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने हा भीषण अपघात झाल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. या अपघातात २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Odisha Train Accident
Video Viral : टार्गेटवरून बॉसने कर्मचाऱ्यांना झापलं; HDFC बँकेने दाखवला थेट घरचा रस्ता

ओडिशा सरकारने रविवारी रेल्वे अपघातातील मृतांची संख्या दुरुस्त करत २८८ वरून २७५ केली आहे. तर जखमींची संख्या१,१७५ केली. मुख्य सचिव पीके जेना यांनी दिलेल्या माहितीनुसार काही मृतदेहांची दोनदा मोजणी करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.