Narendra Modi
Narendra Modi sakal

Narendra Modi : देशाचे सैन्यदल तरुण ठेवण्यासाठी अग्निवीर

‘‘देशाचे सैन्यदल कायम तरुण ठेवण्यासाठी लष्कराकडून करण्यात आलेल्या काही आवश्‍यक सुधारणांपैकी एक म्हणजे अग्निवीर योजना असून, विरोधकांकडून त्यावरही राजकारण केले जात आहे,’’
Published on

‘‘देशाचे सैन्यदल कायम तरुण ठेवण्यासाठी लष्कराकडून करण्यात आलेल्या काही आवश्‍यक सुधारणांपैकी एक म्हणजे अग्निवीर योजना असून, विरोधकांकडून त्यावरही राजकारण केले जात आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. अग्निवीर ही योजना निवृत्तीवेतनावरील खर्च टाळण्यासाठी आणण्यात आल्याचा दावाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी फेटाळून लावला. ‘‘अग्निवीर योजनेचा उद्देश हा लष्करातील जवानांचे सरारी वय तरुण ठेवणे आणि लष्कराला कायम युद्धसज्ज ठेवणे हेच आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.

‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय जवानांचे सरासरी वय हे जास्त आहे, सैन्यदलातील जवानांचे सरासरी वय हे कमी असावे यावर गेल्या कित्येक दशकांपासून संसदेमध्ये यावर चर्चा होत होत्या, अनेक समित्यांनी देखील याबद्दल सूचना केल्या होत्या. परंतु राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या प्रश्‍नावर ठाम निर्णय घेण्याची इच्छाशक्ती आधीच्या सरकारांनी दाखवली नाही. दुर्दैवाने विरोधीपक्ष यासारख्या एका संवेदनशील आणि राष्ट्रीय सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्याला राजकीय मुद्दा बनवत आहे. काही जण वैयक्तिक स्वार्थासाठी लष्करामधील सुधारणांच्या मुद्द्यांचेही राजकारण करतात,’’ असे मोदी म्हणाले. ‘‘आमच्या सरकारने मात्र लष्कराने घेतलेल्या या निर्णयाचा स्वीकार केला कारण आमच्यासाठी राजकारणापेक्षा देशाची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे,’’ असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

विरोधकांवर टीका

‘‘काहीजण म्हणतात की, सरकारने सैन्य दलाच्या निवृत्तिवेतनाचा पैसा वाचविण्यासाठी हा निर्णय घेतला. मला त्यांना विचारायचे आहे की, आज जे भरती होतील त्यांच्या निवृत्तिवेतनाचा मुद्दा हा अजून तीस वर्षांनी निर्माण होईल, मग त्याबाबत सरकार आता का निर्णय घेईल.’’ असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित करत विरोधकांवर जोरदार टीका केली. ‘‘जे लोक अग्निवीर योजनेवरून देशांतील युवकांची दिशाभूल करत आहेत, त्यांना जवानांबद्दल काही आत्मीयता वाटत नाही याला इतिहास साक्षीदार आहे. हे तेच लोक आहेत ज्यांनी वन रॅंक वन पेन्शन बद्दल खोटी माहिती दिली, ज्यांनी सैन्यदलासाठीच्या निधीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला असा आरोपही त्यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com