Costa Rica zoo : पहिलेच अजब उदाहरण ; मगर नराशिवाय बनली गर्भवती; कोस्टा रिकाच्या प्राणिसंग्रहालयातील घटना

कोस्टा रिका या देशातील प्राणिसंग्रहालयात मात्र मगर नराशिवाय गर्भवती झाल्याचे आढळले
Costa Rica zoo crocodile pregnant
Costa Rica zoo crocodile pregnantsakal
Updated on

नवी दिल्ली : साधारणत: सजीवातील कोणतीही मादी नराच्या मीलनाशिवाय गर्भवती राहून प्रजोत्पादन करू शकत नाही. कोस्टा रिका या देशातील प्राणिसंग्रहालयात मात्र मगर नराशिवाय गर्भवती झाल्याचे आढळले आहे.

मगरींमधील हे अशा प्रकारचे पहिलेच उदाहरण आहे. या मगरीने अनुवंशिकदृष्ट्या ९९.९ टक्के स्वत:सारखाच असणाऱ्या मृत पिलास जन्म दिला आहे, असे संशोधकांनी सांगितले. याबाबतच्या संशोधनाचे निष्कर्ष ‘बायोलॉजी लेटर्स’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.

अमेरिकेतील व्हर्जिनिया पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आणि स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या मतानुसार, मगरीने नराशिवाय पिल्लाला जन्म देण्याच्या या अतिशय दुर्मीळ घटनेचे पहिल्यांदाच दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे.

गेल्या दोन दशकांपासून प्राणिशास्त्रज्ञ फॅकल्टेटिव्ह पार्थेनोजेनेसिस (एफपी) या पृष्ठवंशीय प्राण्यांच्या पुनरुत्पादन पद्धतीचे वाढत्या प्रमाणात दस्ताऐवजीकरण करत आहेत. या पद्धतीत मादी समागमाशिवाय पुनरुत्पादन करते किंवा अंडी घालते. काही पक्ष्यांसह पाल, सापांसारखे सरपटणारे प्राणी तसेच काही प्रजातींचे मासे अशा वेगळ्या पद्धतीने पुनरुत्पादन करत असल्याचे दिसून आले आहे, असेही संशोधकांनी नमूद केले.

कोस्टा रिका देशातील प्राणिसंग्रहालयात ‘क्रोकोडायलस ॲक्युटस’ ही अमेरिकी मगर ‘एफपी’ पद्धतीने गर्भवती राहिली आहे. अमेरिकी मगरीमधील हे पहिलेच उदाहरण असून ‘बायोलॉजी लेटर्स’ नियतकालिकात एफपीच्या पुराव्यांचे दस्तावेजीकरण करण्यात आले आहे.

Costa Rica zoo crocodile pregnant
Wildlife Animal Census : डोलारखेड्यात पट्टेदार वाघ, यावल अभयारण्यात बिबट्या

सुमारे १६ वर्षांपासून बंदिवासात असलेल्या या मगरीचे २०१८ मध्ये निरीक्षण करण्यात आले. या मगरीला इतर मगरींपासून वेगळे ठेवण्यात आले होते. तरीही मगरीने १४ अंडी घातली होती. त्यापैकी एका अंड्यामध्ये मगरीचा गर्भ पूर्णपणे विकसित झाला.

मात्र, त्यातून मृत पिलाने जन्म घेतला. मगरींमधील या दुर्मीळ पुनरुत्पादनाने वैज्ञानिकांची उत्सुकता वाढली कारण,अशा पद्धतीने जन्मलेल्या पिलांमध्ये लैंगिक गणुसूत्र आढळत नाही. त्याचप्रमाणे, अंडी ज्या तापमानात उबविली जातात, त्यावर जन्मणाऱ्या पिलाचे लिंग निश्चित होते. एखाद्या प्राण्यामध्ये उत्क्रांतीच्या टप्प्यातून गेलेल्या पूर्वजांकडून हा गुण वारसारुपाने आला असावा.

Costa Rica zoo crocodile pregnant
Crocodile Viral News : ऐय्यो... या देशाने पाळल्यात चक्क १२ लाख मगरी, कायद्याने करतात मगरींची शेती

त्यामुळेच डायनोसॉरही स्वत:च पुनरुत्पादन करण्यास सक्षम असावेत, असेही संशोधकांचे म्हणणे आहे. अमेरिकी मगरीने अशा प्रकारे एकट्यानेच पुनरुत्पादन करणे हे मगरीच्या नामशेष झालेल्या अर्कोसॉरियन पूर्वजांमध्ये विशेषत: टेरोसॉरिया आणि डायनासोरिया प्रजातींमध्ये अशा प्रकारची क्षमता होती, यावर प्रकाशझोत टाकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

अमेरिकेतील व्हर्जिनिया टेकमधील प्राध्यापक वॉरेन बूथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मगरीच्या गर्भाचे विश्लेषण केले. त्यावेळी अनुवांशिकदृष्ट्या मगरीचा गर्भ ९९.९ टक्के तिच्यासारखाच असल्याचे आढळले. यातून त्याच्या जन्मात नराचे योगदान नसल्याचे सिद्ध झाले.

फॅकल्टेटिव्ह पार्थेनोजेनेसिस (एफपी) म्हणजे काय?

ही एकल पुनरुत्पादनाची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे. या पद्धतीत कोणत्याही प्राण्याची मादी लैंगिक किंवा अलैंगिक पद्धतीशिवाय पुनरुत्पादन करते. मात्र, निसर्गात ‘एफपी’ अत्यंत दुर्मीळ आहे. काही निवडक प्रजातींमधील प्राणीच अशा प्रकारे एकट्याने पुनरुत्पादन करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.