Semiconductor Chip: पहिली 'मेड इन इंडिया' सेमीकंडक्टर चिप डिसेंबर 2024 पर्यंत; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा दावा

Semiconductor chip: केंद्र सरकारने 29 फेब्रुवारी रोजी भारतात तीन सेमीकंडक्टर युनिट्स उभारण्यास मान्यता दिली होती.
Union Minister Ashwini Vaishnav
Union Minister Ashwini Vaishnavesakal
Updated on

Semiconductor chip: भारत या वर्षाच्या अखेरीस पहिल्या स्वदेशी सेमीकंडक्टर चिप लाँच करण्याचा साक्षीदार असेल, असे केंद्रीय दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने 29 फेब्रुवारी रोजी भारतात तीन सेमीकंडक्टर युनिट्स उभारण्यास मान्यता दिली होती.

अश्विनी वैष्णव म्हणाले, "आमच्याकडे डिसेंबर 2024 पर्यंत पहिली मेड इन इंडिया चिप असेल. आम्ही यासाठी पहिला प्रयत्न 1962 मध्ये केला होता, परंतु जोपर्यंत तुमच्याकडे योग्य धोरण आणि योग्य विश्वास नसेल तोपर्यंत हे होऊ शकत नाही. पंतप्रधान मोदींना खात्री आहे की यासाठी विकसित भारतासाठी आम्हाला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची गरज आहे. टीव्हीपासून पॉवर इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत, प्रत्येक गोष्टीत आम्हाला सेमीकंडक्टरची गरज आहे."

वैष्णव यांनी खुलासा केला की सेमीकंडक्टरचे उत्पादन प्रत्यक्षात येईल याची खात्री करण्यात पंतप्रधानांचा सखोल सहभाग आहे. सेमीकंडक्टर उत्पादनाबाबत चर्चेसाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 45 मिनिटांचा वेळ मागायचो पण ते चर्चेसाठी सुमारे 3 तास देत असत. ते प्रत्येक घटकावर ओळीने तपशीलवार चर्चा करायचे. सर्व विभागांना वैयक्तिकरित्या बोलावले जायचे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.

Union Minister Ashwini Vaishnav
Zomato News : 'शुद्ध शाकाहारी' ग्राहकांची चिंता मिटणार! झोमॅटोने सुरू केली खास सर्व्हिस; जाणून घ्या सविस्तर

19 मार्च रोजी आयोजित ‘न्यूज 18 रायझिंग भारत समिट’ या  कार्यक्रमात अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. भारत आता इलेक्ट्रॉनिक्स हब बनला आहे. येथून सुमारे 100 कोटी डॉलर (8293.84 कोटी रुपये) किमतीची दूरसंचार उपकरणे निर्यात केली जातात, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. (Latest Marathi News)

सेमीकंडक्टर चिप किती महत्त्वाची आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो की ती स्मार्टफोन, गेमिंग कन्सोल आणि वैद्यकीय उपकरणे आणि वाहने इत्यादी सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमध्ये वापरली जाते. काही काळापूर्वी या चिपच्या कमतरतेमुळे वाहन क्षेत्राला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले होते आणि कंपन्यांना वाहनांच्या बुकिंग ऑर्डरची पूर्तता करता येत नव्हती.

Union Minister Ashwini Vaishnav
PM Narendra Modi : कोण आहे तो भाजप नेता?, ज्यांची आठवण करून PM मोदींच्या डोळ्यात तरळले अश्रू...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.