दिल्ली: कोरोना रुग्णांच्या गुदाशयातून रक्तस्त्राव होण्याची पहिलीच घटना

Corona Update
Corona UpdateGoogle
Updated on

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांमध्ये पहिल्यांदाच अशी काही लक्षणे दिसून आली आहेत, जी याआधी देशात कुठेच पहायला मिळाली नाहीयेत. दिल्लीतील कोरोना रुग्णांमध्ये गुदाशयातून रक्तस्त्राव होण्याशी संबंधित सायटोमेगालव्हायरस (CMV) या रोगाची पहिली केस आज मंगळवारी आढळली आहे.

Corona Update
फेसबुक देणार रिपोर्ट; आयटीच्या नव्या नियमांचा प्रभाव

दिल्लीतील सर गंगा राम हॉस्पिटलमध्ये काही रुग्णांमध्ये हा प्रकार आढळून आला आहे. कोरोना रुग्णांमध्ये आढळून आलेली ही पहिलीच घटना आहे. याबाबत बोलताना प्रा. अनिल आरोरा यांनी म्हटलंय की, या रुग्णांना ओटीपोटात वेदना तसेच शौचातून रक्तस्त्राव होत होता. कोरोना झाल्यानंतर जवळपास 20 ते 30 दिवसांनंतर त्यांना हा त्रास जाणवत आहे. एप्रिल-मे महिन्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आम्हाला CMV चे पाच रुग्ण आढळून आलेत ज्यांनी कोरोनावर मात केली आहे. वय वर्षे 30 ते 70 दरम्यानचे हे रुग्ण आहेत.

Corona Update
पॉझिटिव्ह बातमी! अहमदनगरमधील 821 गावांची कोरोनावर मात

सर गंगाराम हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांनी म्हटलंय की, यावर्षी संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत ही प्रकरणे समोर आली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव आणि छातीच्या आजारामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. चार रुग्णांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनल रक्तस्त्रावाची लक्षणे आहेत तर एका रुग्णामध्ये आतड्यासंबंधी तक्रार केली आहे. पाच रुग्णांपैकी दोघांनी मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत असल्याचं म्हटलंय ज्यामधील एका रुग्णाची इमर्जन्सी शस्त्रक्रिया करावी लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.