रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट घडवणारा 'तो' संशयित दहशतवादी किनारपट्टीचा रहिवासी; 'इसिस'कडून प्रशिक्षण, सिल्व्हर प्लास्टिक बॉम्बचा वापर

रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्बस्फोट (Rameswaram Cafe Bomb Blast Case) घडवून आणणारा संशयित दहशतवादी (Terrorist) मूळचा किनारपट्टीचा रहिवासी आहे.
Rameswaram Cafe Bomb Blast Case
Rameswaram Cafe Bomb Blast Caseesakal
Updated on
Summary

दहशतवादी संघटना ‘इसिस’कडून प्रेरित झालेल्या संशयिताने रामेश्वरम कॅफेमध्ये सिल्व्हर प्लास्टिक प्रकारातील बॉम्बचा स्फोट घडवून आणला.

बंगळूर : येथील रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्बस्फोट (Rameswaram Cafe Bomb Blast Case) घडवून आणणारा संशयित दहशतवादी (Terrorist) मूळचा किनारपट्टीचा रहिवासी आहे आणि त्याला राजधानी बंगळूरची प्रत्येक इंच अन् इंच माहिती होती, असे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले.

संशयित काही वर्षांपूर्वी राज्य सोडून केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि इतर राज्यांत स्थायिक झाल्याचे तपासात उघड झाले आहे. रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्बस्फोटाच्या दिवशी संशयित चेन्नई-तिरुपती रेल्वेने (Chennai-Tirupati Railway) बंगळूरला आला आणि त्याने बॉम्बस्फोट केला.

Rameswaram Cafe Bomb Blast Case
'हुकूमशाही वृत्तीतून राज्यघटना बदलण्याचे षड्‍यंत्र, हेगडेंची भाजपमधून हकालपट्टी करा'; मुख्यमंत्री आक्रमक

त्यानंतर बीएमटीसीची बस राजाजीनगरच्या सुजाता बसस्थानकावर आली आणि नंतर त्याने तुमकूरला जाण्यासाठी केएसआरटीसीची बस पकडली. तेथून कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांत फिरून बळ्ळारी येथून तो हैदराबादला जाऊन अज्ञात स्थळी लपून बसला.

Rameswaram Cafe Bomb Blast Case
Belgaum Police : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळकेंना कर्नाटक पोलिसांकडून अटक; हिंडलगा कारागृहात रवानगी

राज्यात आतापर्यंत कुकर आणि टिफिन बॉक्सचे बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत; मात्र रामेश्वरम कॅफेमध्ये हा स्फोट झालेला सिल्व्हर प्लास्टिक बॉम्ब होता, हे विशेष आहे. अशा प्रकारचा बॉम्बस्फोट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘इसिस’च्या दहशतवाद्यांच्या धमकीवरून संशयिताने हे कृत्य केल्याची माहिती एनआयएकडे आहे. संशयित हैदराबादच्या आसपासच्या भागात लपून बसल्याची शक्यता असल्याने आंध्र प्रदेश, तेलंगण, तमिळनाडू आणि केरळमध्ये तैनात असलेल्या एनआयए अधिकाऱ्यांनी त्याला पकडण्यासाठी जाळे रचले आहे.

Rameswaram Cafe Bomb Blast Case
Loksabha Election : भाजपच्या 17 उमेदवारांची अधिकृत घोषणा लवकरच; बेळगावातून शेट्टर, चिक्कोडीत रमेश कत्ती?

‘इसिस’ संघटनेकडून प्रशिक्षण

दहशतवादी संघटना ‘इसिस’कडून प्रेरित झालेल्या संशयिताने रामेश्वरम कॅफेमध्ये सिल्व्हर प्लास्टिक प्रकारातील बॉम्बचा स्फोट घडवून आणला. त्याला इसिस संघटनेकडून प्रशिक्षण मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. तपासादरम्यान, बॉम्बस्फोटापूर्वी संशयिताला तमिळनाडूमधील शिवनसमुद्र, गुंडलूपेट, कृष्णागिरी आणि केरळ सीमा वनक्षेत्रात प्रशिक्षण दिल्याचेही समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.