Train : देशातली पहिली रेल्वे मुंबई-ठाणे दरम्यान नाही तर 'या' राज्यात धावली होती..

स्वस्त आणि परवडणारा प्रवास सोयिस्कर आणि संरक्षित म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते.
First train
First train
Updated on
Summary

स्वस्त आणि परवडणारा प्रवास सोयिस्कर आणि संरक्षित म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते.

रेल्वेचा शोध जगात जे काही मोठे शोध लागले त्या शोधांमध्ये गणला जातो. विमानाने देश आणि प्रमुख शहरे जोडण्याचे काम केले. तर रेल्वेने छोट्या शहरांना राज्याशी जोडण्याचं काम केलं. रेल्वेने अगदी सुरुवातीपासून सर्वसामान्य ते अगदी नोकरदार वर्ग आणि इतरांना जोडण्याचं काम केलं आहे. स्वस्त आणि परवडणारा प्रवास सोयिस्कर आणि संरक्षित म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं.

भारतात पहिली ट्रेन कधी आणि कुठे धावली असा प्रश्न केला तर उत्तर येत की, भारतातील पहिली ट्रेन 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणेदरम्यान धावली. देशातील पहिली रेल्वे सुरुवातीला (Train History in India) कुठे धावली असे विचारले असता तुम्ही आश्चर्य चकित व्हाल. ही रेल्वे इथे नाही तर देशाच्या इतर कोपऱ्यात धावली होती. चला तर मग जाणून घ्या.. काय आहे ही संपूर्ण कहाणी.

First train
महिला कपाळावर टिकली का लावतात याचे वैज्ञानिक कारण माहितीये का?

रेल्वेला भारतात आणण्याचं श्रेय ब्रिटिशांना जातं. इंग्रजांनी आपल्या फायद्यासाठी भारतात रेल्वे सुरू केली असली तरी त्याचा सर्वाधिक फायदा भारतीयांना झाला. आतापर्यंत आपल्याला अशी माहिती मिळाली आहे की, भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती. मात्र त्याआधी दोन वर्षांपूर्वीच देशात रेल्वे सुरू झाली होती. हे ऐकूण तुम्हाला आश्चर्य होईल. 1853 च्या दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 22 डिसेंबर 1851 रोजी सध्याच्या उत्तराखंडमधील रुरकी आणि पिरान कालियार दरम्यान पहिली रेल्वे धावली होती.

आपण ज्या रेल्वेसंदर्भात बोलतोय ती गुड्स म्हणजेच मालवाहतूक करणारी रेल्वे होती. वास्तविक शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी ब्रिटीशांनी कालवा बांधण्याची योजना आखली होती. हा कालवा गंगा नदीतून उगम पावत होता आणि त्यासाठी भरपूर माती लागणार होती. या योजनेचे मुख्य अभियंता थॉमसन होते. त्यांनी रुरकीपासून १० किमी अंतरावर असलेल्या पिरान कालियार येथून माती आणण्यासाठी रेल्वे इंजिनला ऑर्डर दिली होती.

First train
Chole Recipe : घरीच रेस्टॉरंट स्टाइलमध्ये मसालेदार छोले कसे बनवावे, पाहा रेसिपी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.