Aditya Prakash : ‘जेईई ॲडव्हान्स्ड’मध्ये ‘फिट्जी’ची उत्तम कामगिरी

फिट्जी’ (एफआयआयटीजेईई) या संस्थेतील विद्यार्थ्यांनी ‘जेईई ॲडव्हान्स्ड २०२४’ परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
Aditya Prakash
Aditya Prakashsakal
Updated on

नवी दिल्ली : ‘फिट्जी’ (एफआयआयटीजेईई) या संस्थेतील विद्यार्थ्यांनी ‘जेईई ॲडव्हान्स्ड २०२४’ परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थेच्या आदित्य प्रकाश याने ‘एआयआर २’ श्रेणी मिळवली आहे. त्याला ३६०पैकी ३४६ गुण मिळवले आहेत. दिल्लीत तो प्रथम आला आहे.

‘‘मी नववीत असतानाच ‘फिटजी’मध्ये प्रवेश घेतला. तेथील वातावरण आणि समर्पित शिक्षकांमुळे मला माझ्या क्षमतांची जाणीव होण्यास मदत झाली,’’

असे आदित्यने सांगितले. ‘फिट्जी’च्या पंजाबी बाग केंद्राचे प्रमुख आणि व्यवस्थापकीय भागीदार पार्थ हालदार म्हणाले, ‘‘आमच्या विद्यार्थ्यांनी ‘जेईई ॲडव्हान्स्ड’मध्ये केलेल्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.’’ ‘फिट्जी’च्या आणखी तीन विद्यार्थ्यांनी ‘जेईई ॲडव्हान्स्ड २०२४’मध्ये अखिल भारतीय स्तरावरील पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.