देशाला हादरवणाऱ्या म्हैसूर बलात्कार प्रकरणात पाच जणांना अटक

एमबीएच्या विद्यार्थीनीबरोबर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली होती.
देशाला हादरवणाऱ्या म्हैसूर बलात्कार प्रकरणात पाच जणांना अटक
Updated on

बंगळुरू: देशाला हादरवून सोडणाऱ्या म्हैसूरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार (Mysuru Gang Rape) प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद यांनी ही माहिती दिली आहे. सहावा आरोपी अजून हाती आलेला नसून, पोलीस त्याच्या मागावर आहेत, असे सूद यांनी सांगितले. अटक करण्यात आलेले पाचही आरोपी तामिळनाडूतून (tamilnadu) आलेले मजूर आहेत. त्यांच्यात एक आरोपी अल्पवयीन असण्याची शक्यता आहे.

आम्ही आता पूर्ण खात्रीनिशी सांगू शकत नाही. त्या आरोपीच्या वयाचा तपास सुरु आहे अशी माहिती प्रवीण सूद यांनी दिली. म्हैसूरमध्ये चामुंडी येथे फिरायला गेलेल्या एका एमबीएच्या विद्यार्थीनीबरोबर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली होती. पीडित मुलगी मित्रासमवेत असताना ही घटना घडली होती. मुलीच्या मित्राला आरोपींनी मारहाण केली होती. या घटनेने दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाची आठवण करुन दिली.

देशाला हादरवणाऱ्या म्हैसूर बलात्कार प्रकरणात पाच जणांना अटक
काबूल बॉम्बस्फोट: इस्लामिक स्टेट खोरासनमध्ये केरळचे १४ जण

काय घडलं होतं...

पीडितेची प्रकृती गंभीर असून ती जबाब देण्याच्या परिस्थितीमध्ये देखील नाही. त्यामुळे पोलिसांनी तिच्या मित्राचा जबाब नोंदविला आहे. त्यानुसार 'पीडिता ही कर्नाटकची रहिवासी नसून त्याठिकाणी शिकण्यासाठी आलेली आहे. ती तिच्या मित्रासोबत मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जंगल परिसरात असलेल्या हेलिपॅडकडे गेली होती. त्याचवेळी चार ते पाच जण त्यांचा पाठलाग करत होते. दोघेही एकाकी असल्याचा फायदा उचलून त्यांनी तिच्यावर सामूहीक बलात्कार केला. सर्व आरोपी दारू प्यायलेले होते. त्यांनी सुरुवातील या जोडप्यांची लूटमार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर विद्यार्थिनीला झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी तिच्या मित्राने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली.' तिच्या मित्राच्या जबाबावरून अलानाहल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

देशाला हादरवणाऱ्या म्हैसूर बलात्कार प्रकरणात पाच जणांना अटक
जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार रिक्षा चालवतात

कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

"संध्याकाळी सात-साडेसातला ती मुलगी तिथे काय करत होती? सुर्यास्तानंतर ती तिच्या वर्गमित्रासोबत तिथे का गेली होती? पण आम्ही काय करु शकतो, लोक कुठल्याही वेळी, कुठल्याही ठिकाणी जायला मोकळे आहेत" असे अरागा ज्ञानेंद्र या प्रकरणात तपासाचा आढावा घेतल्यानंतर म्हणाले होते.

एकप्रकारे त्यांनी मुलीलाच जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला. पीडीत मुलीबरोबर जे घडलं, त्या बद्दल संवेदनशीलता दाखवून राज्य महिलांसाठी अधिक सुरक्षित करण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. पण गृहमंत्री एकटेच नाहीत, तर अन्य काही जणांनीही पीडित मुलगी संध्याकाळच्यावेळी बाहेर का गेली? असा प्रश्न उपस्थित केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.