भारतासह 'हे' पाच देश १५ ऑगस्टला साजरा करतात 'स्वातंत्र्यदिन'

जाणून घ्या भारतासह या देशांत कसा साजरा केला जातो स्वातंत्र्यदिन
Independence day
Independence dayANI
Updated on

नवी दिल्ली : १५ ऑगस्ट २०२१ रोजी भारताच्या स्वांतत्र्यांची ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतासह आणखी पाच देशांचा स्वातंत्र्यदिन एकाच दिवशी असतो. हे देश कोणते आहेत? त्यांच्या स्वातंत्र्याची कहाणी काय आहे? तसेच या देशांमध्ये कशा पद्धतीनं स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो हे आपण पाहणार आहोत.

Independence day
Blog: स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी आणि बाबासाहेबांचा 'तो' इशारा
  • भारत : १२९ वर्षांपासूनच्या इंग्रज राजवटीपासून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी मुक्त झाला. त्यामुळे भारतात हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. यंदा आपण ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. इंग्रजांनी भारताला स्वातंत्र बहाल करताना देशाची फाळणीही केली. त्यामुळे पाकिस्तान आणि भारत हे दोन देश निर्माण झाले. पाकिस्तानला १४ ऑगस्ट रोजी तर भारताला १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळालं. भारतात स्वातंत्र्यदिन साजरा करताना ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांचं स्मरण केलं जातं. सर्वत्र उत्साहाचं वातावरणं असतं. सर्व सरकारी आणि खासगी संस्था, कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांच्या इमारतींवर राष्ट्रध्वज फडकावला जातो. सगळीकडे मिठाईचं वाटप केलं जातं, एकमेकांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. देशाचे पंतप्रधान राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन ध्वजवंदन करुन देशाला संबोधित करतात. अशा प्रकारे भारतात स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. इतर देशांमध्ये स्वातंत्रदिन कसा साजरा केला जातो पाहुयात.

Independence day
स्वातंत्र्यदिनाची पूर्वसंध्या: पाहा संसदेपासून ते अटारी बॉर्डरपर्यंतचे फोटो
  • लाइक्टेन्स्टाईन : युरोप खंडातील या देशात सन १९४० पासून १५ ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय दिवस' म्हणून पाळला जातो. हा स्वातंत्रदिन साजरा करत असताना या देशात रात्री १० वाजण्याच्या सुमारास पारंपारिक पद्धतीनं फटाक्यांची आतषबाजी केली जाते. सन १९९० मध्ये या देशात अधिकृतरित्या १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली. या सुट्टीमागे दोन कारणं होती. एक म्हणजे या दिवशी बँकेला सुट्टी असते आणि सन १९४० मध्ये इथला राजा दुसरा प्रिन्स फ्रान्झ रोझ याचा १६ ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो. सन १९८९ मध्ये या राजाचा मृत्यू झाल्यानंतरही या देशात सुट्टीची ही परंपरा कायम आहे. लाइक्टेन्स्टाईन देशाची राजधानी असलेल्या वडूझ येथील किल्ल्यासमोरील लॉनमध्ये हजारो नागरिक एकत्र जमतात. यावेळी इथला प्रिन्स आणि पार्लमेंटचे अध्यक्ष देशातील जनतेला संबोधित करतात यावेळी उपस्थित नागरिक स्वातंत्र्यदिनाचं मोठं सेलिब्रेशन करतात. यावेळी या किल्ल्यासमोरील गार्डनमध्ये स्वागतसमारंभ आयोजित केला जातो यासाठी सर्व नागरिकांना आमंत्रण असतं. जनतेसाठी याच एका दिवशी हे गार्डन खुलं करण्यात येतं.

Independence day
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कोरोना लसीकरणात विक्रमी कामगिरी
  • बहारिन : या देशाला १५ ऑगस्ट १९७१ मध्ये ब्रिटिशांपासून स्वातंत्र मिळालं. हा पहिला अरब देश होता जिथे तेलाचे साठे सापडले त्यानंतर सन १९३१ मध्ये तिथं तेल शुद्धिकरणाचा कारखाना उभारला गेला. ब्रिटन आणि ऑटोमन सरकारने १९१३ मध्ये बहारिनच्या स्वातंत्र्य करारावर स्वाक्षरी केली असली तरी तो १९७१ पर्यंत ब्रिटिश अंमलाखाली राहिला. त्यानंतर सन १९७१ रोजी बहारिननं देश स्वतंत्र झाला. वास्तविक बहारिन १४ ऑगस्ट रोजी मुक्त झाला पण देशाचा स्वातंत्र्यदिन म्हणून १५ ऑगस्ट हा दिवस ओळखला जाऊ लागला.

Independence day
'भारताकडे जग विस्मयानं पाहतं'; राष्ट्रपती कोविंद यांचं देशाला उद्देशून संबोधन
  • रिपब्लिक ऑफ काँगो : हा एक मध्य अफ्रिकन देश आहे. सन १९६० मध्ये फ्रान्सपासून हा देश स्वतंत्र झाला. तत्पूर्वी फ्रेन्च राज्यकर्त्यांनी या देशावर ८० वर्षे राज्य केलं. त्यानंतर १५ ऑगस्ट १९६० रोजी काँगोला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं आणि तो रिपब्लिक झाला. या दिवसाला इथे 'काँगोलिस नॅशनल डे' असं म्हटलं जातं. स्वातंत्र्यानंतर सन १९६९ ते १९९२ पर्यंत या देशाचा कारभार मार्क्स-लेनिनच्या विचारसरणीवरील एकाच पक्षाच्या झेंड्याखाली चालत होता. त्यानंतर सन १९९२ मध्ये काँगोमध्ये पहिल्यांदा बहुपक्षिय निवडणुका पार पडल्या.

Independence day
ताज्या बातम्यांसाठी जरुर ऐका, 'सकाळ'चं PODCAST
  • दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया : हे दोन्हीही स्वतंत्र देश असून त्यांच्या स्वातंत्र्यदिनाला 'ग्वांगबोक्जेओल' असं संबोधलं जातं. या शब्दाचा अर्थ, प्रकाशाची पुन्हा साठवणूक असा होतो. सन १९४५ पासून जपानच्या अधिपत्याखाली असलेला हा देश ३५ वर्षांनंतर म्हणजे सन १९८० मध्ये स्वतंत्र झाले. आता हे दोन्ही देश वेगळे झालेले असले तरी ते आपला सामाईक स्वातंत्र्यदिन साजरा करतात. तिथं स्वातंत्र्य दिनाला 'नॅशनल लिबरेशन डे ऑफ कोरिया' असंही म्हटलं जातं. १५ ऑगस्ट १९८० रोजी दुसऱ्या महायुद्धात जपानच्या साम्राज्यानं शरणागती पत्करली होती. त्यानंतर तीन वर्षांनी कोरियाचे दोन देशांत विभाजन झालं. यांपैकी उत्तर कोरिया हा सोव्हियत संघाचा समर्थक होता तर दक्षिण कोरिया हा अमेरिकेचा समर्थक देश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.