भारत चीनवरील अवलंबित्व पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करत आहे. यानुसार भारताने अर्जेंटिनाच्या एका कंपनीसोबत लिथियमसंबंधी करार केला आहे. लिथियमचा वापर रिचार्जेबल बॅटरिंमध्ये केला जातो. या क्षेत्रात चीनचा मोठा दबदबा आहे. याच पार्श्वभूमीवर जगामध्ये असे काही पदार्थ आहेत, ज्यांच्या किंमतीचा तुम्ही अंदाजाही लावू शकत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सोने आणि हिरेही या वस्तूंसमोर फिके आहेत.
फ्रॅनशियम
या पदार्थाची किंमत येऊन तुम्ही चक्रावून जाल. फ्रॅनशियमची किंमत 1 अब्ज डॉलर प्रति ग्राम आहे. हे तत्व केवळ 22 मिनिट वातावरणात राहते. त्यानंतर तो नष्ट होतो. याचा कशासाठीही उपयोग केला जात नाही, त्यामुळे याचे निर्माणही होत नाही.
कॅलिफोर्नियमची किंमत 250 लाख डॉलर प्रति ग्रॅम आहे. या पदार्थाला 1950 मध्ये कॅलिफोर्निया विश्वविद्यालयात निर्माण करण्यात आले होते. याला क्युरियम आणि अल्फा पार्टिकलनी मिळून बनवलं जातं. जगात हे तत्व अर्ध्या ग्रामपर्यंतच उपलब्ध आहे.
कार्बन
65 हजार डॉलरला मिळणारे हे तत्व जीवनात खूप महत्त्वाचे आहे. कार्बनची किंमत त्याच्या वेगवेगळ्या प्रकारावर अवलंबून आहे. कार्बनपासून कोळसा बनतो, तो जास्त महान नसतो, पण कार्बनपासूनच बनणारा हिरा कोट्यवधी रुपयांचा असू शकतो.
न्यूक्लिअर शस्त्र आणि रिअॅक्टर बनवण्यासाठी प्लूटोनियमचा वापर होतो. हा रेडियोएक्टिव तत्व आहे, त्यामुळे खूप कमी लोक याचा वापर करतात. याची किंमत 4 हजार डॉलर प्रति ग्रॅम आहे. प्लूटोनियमचा वापर करण्यासाठी लायसेन्सची आवश्यकता लागते.
स्कँडियम
अगदी कमी प्रमाणात आढळणाऱ्या या पदार्थाला 1970 मध्ये शोधण्यात आलं होतं. याचा वापर अलॉयमध्ये केला जातो. याची किंमत 270 डॉलर प्रति ग्रॅमपर्यंत असू शकते. जगभरात जवळपास 10 मिलियन ग्रॅमचा याचा व्यापार होतो, याचा टर्नओव्हर 2.7 अब्ज डॉलरपर्यंत जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.