माहेरी आलेल्या मुलीला बसला धक्का; पाच जणांचे मृतदेह दिसले लटकलेले

Five members of the same family commit suicide
Five members of the same family commit suicideFive members of the same family commit suicide
Updated on

बिहार : एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत (commit suicide) सापडले. हे प्रकरण बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील विद्यापतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौ धनेशपूर दक्षिण गावातील आहे. आर्थिक विवंचनेमुळे कुटुंबाने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मनोज झा (४२), सुंदर मणी (३८), सीता देवी (६५), सत्यम (१०) आणि शिवम (७) अशी मृतांची नावे आहेत. (Five members of the same family commit suicide)

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज हे पत्नी सुंदर मणी, आई सीता देवी आणि मुले सत्यम आणि शिवम यांच्यासह राहत होता. मनोजला दोन मुलीही आहेत, त्यापैकी एक मुलगी निभा पतीसोबत माहेरी आली होती. निभाने सांगितले की, ती आणि नवरा दुसऱ्या खोलीत झोपले होते. सकाळी जाग आल्यावर शेजारील खोली उघडी दिसली. खोलीत डोकावून बघितले असता पाच जणांचे मृतदेह फासावर (commit suicide) लटकलेले दिसले.

Five members of the same family commit suicide
संजय राऊत म्हणाले, रात्री १२ वाजता आमित शहांना फोन केला होता अन्...

मृतदेह पाहताच आरडाओरडा सुरू केली. यामुळे आजूबाजूचे नागरिक जमा झाले. एकाने लगेच पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पाचही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळाजवळ लोकांची गर्दी जमली होती. पोलिसांनी मोठ्या कष्टाने जमाव हटवला.

आर्थिक विवंचनेमुळे कुटुंब त्रस्त

शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समजेल. प्राथमिक तपासात मृत व्यक्तीने कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. मुलीच्या लग्नासाठीही मनोजने कर्ज घेतले होते. कुटुंबावर कर्जाचा ताण होता. त्यामुळे ते खूप अस्वस्थ होते. आर्थिक विवंचनेमुळे हे कुटुंब त्रस्त असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितल्याचे दलसिंगसरह एसपी हृदयकांत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()