Shalmala River : सहलीवर आलेल्या कुटुंबाचा दुःखद शेवट! पाच जणांचा शाल्मला नदीत बुडून दुर्दैवी अंत

शाल्मला नदीत (Shalmala River) रविवारी पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
Shalmala River in Sirsi Karwar
Shalmala River in Sirsi Karwaresakal
Updated on
Summary

कौटुंबिक सहलीवर आलेल्यांचा दुःखद शेवट झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

बंगळूर : कारवार जिल्ह्यातील शिर्सीजवळील (Karwar Sirsi) शाल्मला नदीत (Shalmala River) रविवारी पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. कौटुंबिक सहलीवर आलेल्यांचा दुःखद शेवट झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Shalmala River in Sirsi Karwar
प्रवाशांची चिंता वाढवणारी बातमी! सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वेचा 'हा' पूल पाडण्यात येणार; काय आहे कारण?

सलीम (वय ४४), उमर सिद्दीकी (वय १४), नादिया शेख (वय २२), नाभिल (वय २२) आणि मिसबाह (वय २१) अशी मृतांची नावे आहेत. ते सर्व शिर्सीचे रहिवासी आहेत. पोलिस (Police) अधिकाऱ्याने सांगितले की, नादियाचे दोन आठवड्यांपूर्वी हासन येथील एका व्यक्तीशी लग्न झाले होते. जवळपास ३० लोक पोस्ट वेडिंग पिकनिकसाठी आले होते.

Shalmala River in Sirsi Karwar
तोडगा न काढल्यास उदयनराजेंच्या नेतृत्वात पुणे-बंगळूर महामार्गाचं काम बंद पाडू; माजी आमदाराचा स्पष्ट इशारा

कुटुंबातील सदस्य नदीजवळ खेळत असताना मुलगा नदीत पडला. कुटुंबातील इतर सदस्यांनी मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. रविवारी रात्री उशिरापर्यंत बचाव कर्मचाऱ्यांनी दोन मृतदेह बाहेर काढले. तर सोमवारी सकाळी शोधमोहीम सुरू होती. स्थानिक मच्छिमार मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचावकर्त्यांना मदत करत आहेत. वराच्या बाजूने शाल्मला नदीजवळ पार्टी आयोजित केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()