मुस्लिम धर्माविरोधात घोषणाबाजी, भाजप नेत्यासह पाज जण ताब्यात

मुस्लिम धर्माविरोधात घोषणाबाजी, भाजप नेत्यासह पाज जण ताब्यात
Updated on

जंतर मंतर येथे रविवारी भारत जोडो आंदोलनातील वादग्रस्त भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची परवानगी घेतली नव्हती. आंदोलनादरम्यान मुस्लिम धर्माविरोधात घोषणाबाजी केल्याचे व्हिडिओत दिसते. याप्रकरणी मंगळवारी पहाटे तीन वाजता भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एएनआयने दिल्ली पोलिसांच्या हवाल्यानं हे वृत्त प्रसारित केलं आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंतर मंतर येथील वादग्रस्त भाषणाप्रकरणी अश्विनी उपाध्याय यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे. रविवारी रात्री व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आपला तपास आधिक वेगानं सुरु करत घोषणाबाजी करणाऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. कार्यक्रमाचे आयोजन करणारे भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

मुस्लिम धर्माविरोधात घोषणाबाजी, भाजप नेत्यासह पाज जण ताब्यात
मॉल, रेस्टॉरंट, मंदिरं उघडण्याबाबत एकमत, पण...

सेव्ह इंडिया फाउंडेशनने ८ ऑगस्ट १९४७ रोजीच्या भारत छोडो आंदोलनावर आधारित भारत जोडो आंदोलन पुकारले होते. काल जंतर मंतरवर सेव्ह इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रीत सिंग आणि सरचिटणीस अरविंद त्यागी यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि भाजपचे माजी प्रवक्ते अश्‍विनी उपाध्याय आदी आंदोलनात सामील झाले होते. प्रीत सिंह म्हणाले होते, की इंग्रजांच्या कायद्यामुळे देश इंग्रजी मानसिकतेतूनच चालवला जात आहे. ही बाब धोकादायक आहे. देशात पाच स्वदेशी कायदे तत्काळ अमलात आणावेत. समान शिक्षण, समान नागरिक कायदा, धर्मांतर नियंत्रण कायदा, घुसखोरी नियंत्रण कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा आगामी अधिवेशनात मांडावा. हे कायदे आणण्याचा विचार केला नाही तर रामलिला मैदानावर आंदोलन होईल, असा इशारा देण्यात आला.

मुस्लिम धर्माविरोधात घोषणाबाजी, भाजप नेत्यासह पाज जण ताब्यात
फडणवीस,पाटील यांची शहांबरोबर खलबते, BMC निवडणूक, मनसे युतीवर चर्चा

यादरम्यान आंदोलनात प्रक्षोभक भाषण केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यात मुस्लिम धर्माविरोधात घोषणाबाजी केल्याचे दिसून येते. त्याची दखल घेत पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अश्‍विनी उपाध्याय यांनी व्हिडिओबाबत म्हटले की, अशा कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक भाषणे दिलेली नाहीत. घोषणाबाजी करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.

मुस्लिम धर्माविरोधात घोषणाबाजी, भाजप नेत्यासह पाज जण ताब्यात
दिल्लीवरुन थेट 'मातोश्री'वर, संजय राऊत- उद्धव ठाकरे यांच्यात खलबतं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.