Tank Accident: लडाखमध्ये लष्कराच्या रणगाड्याचा अपघात, पाच जवान शहीद

Soldiers Killed In Tank Accident: जम्मू आणि काश्मीरच्या लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ T-72 रणगाड्याचा दुर्दैवी अपघात झाला आहे. यात पाच जवान शहीद झाले आहेत.
Tank Accident
Tank Accident
Updated on

श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरच्या लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ T-72 रणगाड्याचा दुर्दैवी अपघात झाला आहे. यात पाच जवान शहीद झाले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील लडाखमधील दौलत बेग येथे मंदिर मोर येथे हा अपघात झाला आहे. २०२० मध्ये भारतीय लष्कर आणि चीनच्या पीएलएमध्ये याच ठिकाणी रक्तरंजित संघर्ष झाला होता.

लष्करातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी तीनच्या सुमारास आर्मीचा रणगाडा प्रशिक्षणासाठी बाहेर आणण्यात आला होता. प्रशिक्षणाचा भाग म्हणून रणगाडा पाण्यात उतरवण्यात आला. पण, अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि रणगाड्यातील पाच जवानांचा मृत्यू झाला. पाचही जवानांचे मृतदेह सापडले आहेत.

Tank Accident
Terror Threat in Jammu: जम्मूमध्ये 35-40 दहशतवाद्यांच्या हालचालींमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क, पाकिस्तानी असल्याचा संशय

लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही भारतासाठी महत्त्वाची आहे. १९६२ मधील भारत-चीन युद्ध आणि नुकतेच पीएलएसोबत झालेला संघर्ष या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराला याठिकाणी डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागते. मात्र, या ठिकाणी गस्त घालणे तितकेच कठीण असते. जून २०२० मध्ये झालेल्या संघर्षामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते, तर चीनने त्यांचे चार जवान मृत्यूमुखी पडल्याचं सांगितलं होतं.

Tank Accident
Jammu-Kashmir Encounter: सुरक्षा दल अ‍ॅक्शन मोडमध्ये! काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला केलं ठार, शोध मोहीम सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.