Ram Mandir: 'बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले'; अयोध्येत लागले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर

अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार असून आजपासून पूजा विधी सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फ्लेक्स झळकले आहेत.
Flex of Chief Minister Eknath Shinde started in Ayodhya on ram ghat
Flex of Chief Minister Eknath Shinde started in Ayodhya on ram ghat
Updated on

नवी दिल्ली- अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार असून आजपासून पूजा विधी सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फ्लेक्स झळकले आहेत. राम घाट परिसरात एकनाथ शिंदे यांचे हे झळकलेले फ्लेक्स दिसून आले आहेत. फ्लेक्सवर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, दिवंगत आनंद दिघे यांचे देखील फोटो आहेत.(Flex of Chief Minister Eknath Shinde started in Ayodhya on ram ghat)

राम जन्मभूमी सोहळ्यानिमित्त अयोध्येमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फ्लेक्स पाहायला मिळाले. 'हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेजी की कामना हुई पुरी' असा मजकूर लिहिलेले अनेक फ्लेक्स अयोध्येतील रामघाट परिसरात उभारण्यात आलेले आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत.

Flex of Chief Minister Eknath Shinde started in Ayodhya on ram ghat
Hanuman Movie: अयोध्या राम मंदिरासाठी 'हनुमान'च्या टीमने कमाईतून इतकी रक्कम केली दान

महाराष्ट्रातून येणाऱ्या अनेक रामभक्तांचे डोळे आपोआप या फ्लेक्सकडे वळतायत. नेमके हे फ्लेक्स कोणी लावले हे समजू शकलेलं नाही. तरी या मजकुरातून समोर आलेली भावना ही एका शिवसैनिकाचीच असेल असं मानलं जातंय. राम मंदिराच्या उद्घाटना आधी राजकीय वातावरण देखील रंगू लागलं आहे.

Flex of Chief Minister Eknath Shinde started in Ayodhya on ram ghat
Ayodhya Ram Mandir Prasad : घरबसल्या मिळणार अयोध्या राम मंदिरातील प्रसाद, तोही अगदी मोफत! असं करा ऑनलाईन बुकिंग

२२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. मात्र, १६ जानेवारीपासूनच अयोध्येमध्ये विविध कार्यक्रम आणि पूजा विधींना सुरुवात झाली आहे. अयोध्या नगरी संपूर्णपणे सजली आहे. लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. परिसरात राम भक्तांना शुभेच्छा देणारे पोस्टर सर्वत्र लावण्यात आले आहेत. यात राजकीय नेत्यांनी लावलेल्या पोस्टर्सची संख्या लक्षणीय आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जवळपास आठ हजार मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील राम मंदिराच्या सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे. या दिवसाची सर्व देश आतुरतेने वाट पाहत असताना दिसत आहे. देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी या दिवशी घराघरांत दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.