सर्व विमान कंपन्यांनी तिकिट दरात ४० ते ५० टक्क्यांनी वाढ केली असुन याचा फटका सर्वसामान्यांनी बसणार आहे. आताच कोरोनापासुन सावरले असता हवाई वाहतुक सुरळीत सुरू झाली होती. त्यातच आता हवाई वाहतुक ४० ते ५० टक्क्यांनी वाढल्याने याचा परीणाम अनेक घटकांवर होणार आहे. एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) 26 टक्क्यांनी महाग झाला असुन 80 ते 90% सिटांची विक्रीसुद्धा होत असल्याने तिकीट दरवाढ होत असल्याचे समोर आले आहेत. (Flight ticket cost increased by 40 to 60 percent)
जानेवारीपासुन एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) सातत्याने वाढत आहे. याचा परीणाम तिकीट दरवाढीवर होतोय. तसेच कोरोना आटोक्यात आल्याने प्रवासी हवाई प्रवासात मोठा उत्साह दाखवत आहेत. अशा परीस्थितीत विमान कंपनी डायनॅमिक पद्धत वापरत आहे. सिट वेगाने विकल्या जात असल्यानेच भाडेवाढ करण्यात आली आहे. इंधनाच्या वाढत्या किमती हा भाडेवाढीचा एक निम्मे कारण आहे तर मोठ्या प्रमाणावर सिटांची विक्री हे त्याहून मोठे कारण आहे.
प्रवाशांचा उत्साह लक्षात घेऊन तिकिटांची किंमत ठरवली जाते. विमान प्रवासाची तिकिटे एक वर्ष अगोदर खरेदी करता येतात. परंतु विमान प्रवासाच्या एक महिना आधी किमान 30% तिकिटे विकली जावीत अशी योजना एअरलाईन्स करतात तसे न झाल्यास तिकिटांचे दर कमी केले जातात किंवा काही ऑफर देऊन तिकीटांची विक्री केली जाते. याशिवाय प्रवासाच्या एक महिना आधी तीस टक्क्यांपर्यंत तिकीट विक्री झाली असेल आणि 80 टक्क्यांपर्यंत जागा भरणे अपेक्षित असेल, तर तिकीटाचे दर वाढवले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.