Delhi Flood Yamuna River:उत्तर भारतात सध्या पावसाने हाहाकार माजवलाय. हिमाचलप्रदेशबरोबरच दिल्लीमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे. या जोरदार पावसामुळे यमुना नदीच्या पातळीत वाढ झाली असून नदीला पूर आलाय. दिल्लीमध्ये पूराचं पाणी सीमा ओलांडत शहराच्या विविध भागांमध्ये पोहोचलंय. काश्मिरी गेट, आईटीओसारख्या भागांनंतर पाणी आता सिव्हील लाईन्स पर्यंत आलंय.
यमुना नदीचा जलस्तर २०८.४६ मीटरने वाढला असून पाणी मुख्यमंत्री अरविदं केजरीवाल यांच्या घरापर्यंत अगदी जवळ आलंय.मुख्यमंत्र्याचे घर सिव्हील लाईन्स भागामध्ये आहे, जिकडे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घराबरोबरच पाणी सचिवालयापर्यंत देखील पोहोचलंय. तिकडे, सनलाईट कॉलनीच्या भागामध्ये एका व्यक्तीचा पूराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
हथिनी कुंड बॅराजमधून पाणी सोडलं गेल्याने यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली.बुधवारी पावसाचा ४५ वर्षाचा विक्रम तुटल्यानंतर यमुना नदीने दिल्लीमध्ये हाहाकाराचे संकेत दिले होते. गुरुवारी (दि.१३ जुलै)सकाळपर्यंत पाण्याची पातळी २०८.४६ मीटरपर्यंत वाढली होती. (Latest Marathi News)
त्याचबरोबर दिल्लीच्या बऱ्याच भागात पाणी घरांमध्ये घुसलंय. पूरामुळे अनेक रस्ते बंद करावे लागले असून यमुना नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या वस्त्या पाण्याखाली आल्या आहेत. हजारोच्या संख्येने लोक जीव वाचवून मदत शिबिरांमध्ये आले आहेत.
मयुर फेज १, वजीराबाद, खजुरी आणि राजघाट यांसारख्या भागांमध्येही पूराचं पाणी घुसलंय. डझनभर रस्ते बंद करण्यात आलेत. दिल्ली जैतपूर परिसरातही पाणी लोकांच्या घरात घुसलंय.
पूराच्या पाण्यात बुडून भाजीविक्रेत्याचा मृत्यू
दिल्लीमध्ये आलेल्या पूराच्या पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सनलाईट पोलिस ठाण्याच्या हद्दीतून यमुना नदीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. ४० वर्षीय मनोज सोमवारी मंडावली भागात भाजी विकण्यासाठी गेला होता. (Latest Marathi News)
बुधवारी (दि.१३जुलै)त्याचा मृतदेह कालेखॉं भागातील यमुना नदीतून मिळाला. सनलाईट कॉलनी पोलिसांनी मनोजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्स रुग्णालयात पाठवला आहे.
मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले आवाहन
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांना पूरग्रस्त भागात न जाण्याचा सल्ला दिला, याबरोबरच एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहनही केले.
ते ट्वीट करत म्हणाले की, "यमुना नदीचा पाण्याची पातळी वाढत चालली आहे. आता पाण्याची पातळी २०८.४६ मीटरने वाढली आहे. पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, यमुना नदीच्या जवळील रस्ते पाण्याखाली गेले आहेत."
यापुढे ते म्हणाले की, "तुम्हाला विनंती आहे की रस्त्यांवर जाऊ नये.ज्या पाणी भरलेल्या ठिकाणी लोकसंख्या दाट आहे, तिथून लोकांना काढण्यात येत आहे. तिथे राहणाऱ्या लोकांना विनंती आहे की प्रशासनाला सहकार्य करा. लोकांचा जीव वाचवणे जास्त महत्वाचे आहे. सर्व दिल्लीवासीयांना आवाहन आहे की एकमेकांना सहकार्य करावे. "
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.