अहमदाबाद : तीव्र हवामान आणि व्यापक प्रमाणात करण्यात आलेल्या शहरीकरणामुळे गुजरातमध्ये पूरस्थिती निर्माण झाली, असा दावा भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) गांधीनगरमधील अभ्यासकांनी केला आहे..गुजरातमध्ये २० ते २९ आॅगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस झाला. राज्यातील एकूण ३३ जिल्ह्यांपैकी १५ जिल्ह्यांत या कालावधीत मागील दहावर्षांतील सरासरी पावसापेक्षा अवघ्या तीन दिवसांत अधिक पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. गुजरातमधील मोर्बी, देवभूमी द्वारका आणि राजकोट येथे अशा पद्धतीने कमी दिवसांत अधिक पाऊस पडण्याचे प्रमाण मागील ५० वर्षांत वाढत आहे, असेही अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. देशाच्या पश्चिमी किनारपट्टीवरील राज्यातील तीव्र हवामानाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरीकरण आणि पायाभूत सुविधांच्या कामाचे पुनर्मूल्यांकन करणे अत्यावश्यक आहे, असे मत आयआयटी गांधीनगरच्या अभ्यासकांनी व्यक्त केले आहे..भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांतील तीव्र हवामानाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरांचे नियोजन आणि पायाभूत सुविधा तातडीने सावरण्यासाठीच्या यंत्रणेचे पुनर्मूल्यांकन होणे आवश्यक आहे, असे मत या अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. तीव्र हवामानाच्या परिस्थितीमध्ये निर्माण होणारी गुंतागुंतीची परिस्थिती हाताळण्यास सक्षम असणारी आपत्कालीन यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यता आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.‘‘मागील आठवड्यात बडोद्यामध्ये अतिवृष्टी नसूनही पूरस्थिती निर्माण झाली होती. पूरप्रवण क्षेत्रात होत असणारी विकासकामे आणि सांडपाण्याबाबत नियोजनात केलेल्या तडजोडीमुळे ही परिस्थिती उद्भवली असे अभ्यासकांचे मत आहे..बचाव कार्यात सहभागी तुकड्या१७ तुकड्या - राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल२७ तुकड्या - राज्य आपत्ती प्रतिसाद दल९ तुकड्या - लष्करगुजरात आकडेवारी४९ - पुरामुळे मृत्युमुखी पडलेले नागरिक३७,०५० - पुरातून सुटका करण्यात आलेले नागरिक४२,०८३ - पुरामुळे स्थलांतरित करण्यात आलेले नागरिक५१ - हवाई दलाच्या मदतीने सुटका करण्यात आलेले नागरिक.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.