Delhi Weather Update: धुकं आणि प्रदूषणाची चादर! दिल्ली-एनसीआरला वर्षाच्या पहिल्याच दिवशी फटका, 21 ट्रेन धावल्या उशिराने

Delhi Weather Update: थंडीसोबतच धुके आणि प्रदूषणाचाही परिणाम दिल्ली-एनसीआरवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. 2023 च्या शेवटच्या दिवशी उत्तर भारतातील सात राज्यांमध्ये कडाक्याची थंडी होती.
Delhi Weather Update
Delhi Weather UpdateEsakal
Updated on

थंडीसोबतच धुके आणि प्रदूषणाचाही परिणाम दिल्ली-एनसीआरवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. 2023 च्या शेवटच्या दिवशी उत्तर भारतातील सात राज्यांमध्ये कडाक्याची थंडी होती. नवीन वर्षाची सुरुवातही कडाक्याच्या थंडीने झाली आहे. अनेक भागात दाट धुक्यामुळे रेल्वे, हवाई आणि रस्ते वाहतूक प्रभावित झाली आहे. येत्या दोन दिवसांत लोकांना कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याचा सामना करावा लागू शकतो, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. श्रीनगर आणि अनंतनागमध्ये पारा 3.4 अंश आणि गुलमर्गमध्ये -3.5 अंशांवर नोंदवण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धुके आणि थंड वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने 1 जानेवारीपासून खासगी शाळांसह सर्व शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. एका निवेदनानुसार पंजाबमध्ये शाळा उघडण्याची नवीन वेळ सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. हे 14 जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही राज्यांमध्ये आणि त्यांची राजधानी चंदीगडमध्ये बहुतेक ठिकाणी धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे.

Delhi Weather Update
Weather Update: धुक्यांच्या विळख्यात उत्तर भारत! थंडीमुळे देशातील अनेक ठिकाणच्या शाळा बंद; राज्यात काय स्थिती?

राजस्थानच्या पूर्व आणि पश्चिम भागात काही ठिकाणी थंड वारा आणि रविवारनंतर सोमवारी कमाल तापमानात घट झाल्यामुळे दिवसभर थंडी जाणवली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत पूर्व आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागात कमाल तापमानात घट झाली आहे. त्यानुसार पुढील ३ ते ४ दिवस राज्यात दाट धुक्याचा कालावधी कायम राहण्याचा अंदाज आहे. तर, पुढील ४८ तासांत राज्याच्या उत्तर भागात काही ठिकाणी दाट धुके (200 मीटरपेक्षा कमी दृश्यमानता) नोंदवले जाण्याची शक्यता आहे.

Delhi Weather Update
Israel-Hamas War: भारतातील मुलं जल्लोष करतायत अन् तिकडे गाझामध्ये.... इस्राइल-हमास युद्धाबाबत काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

दाट धुक्यामुळे गाड्यांचा वेग झाला कमी

दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. अशा परिस्थितीत दृश्यमानता खूपच कमी असते. त्यामुळे दिल्लीकडे येणाऱ्या 21 गाड्या उशिराने धावत आहेत. सलग सहाव्या दिवशी दिल्लीकडे येणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत.

बिहारमध्ये तापमानात घट, हवा 'खराब' श्रेणीत

बिहारमध्ये तापमानात घट झाल्यामुळे, रविवारी अनेक शहरांमधील हवेचा दर्जा निर्देशांक (AQI) 'खराब' श्रेणीत राहिला, तर भागलपूरमधील हवेची गुणवत्ता 324 च्या AQI सह 'अत्यंत खराब' श्रेणीमध्ये नोंदवली गेली.

Delhi Weather Update
Accident News : 'न्यू इयर पार्टी' ठरली अखेरची! भीषण अपघातात सहा मित्र जागीच ठार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.