किती ही मस्ती! आधिकाऱ्याचा फोन पडला बंधाऱ्यात; ३ दिवस ३० एचपी पंपाने नासवलं पाणी

food inspector pumped lakhs of liters water from dam for his expensive mobile phone in chhattisgarh
food inspector pumped lakhs of liters water from dam for his expensive mobile phone in chhattisgarh
Updated on

सरकारी आधिकाऱ्यांच्या मुजोर वर्तवणूकीमुळे सामान्यांना त्रास सहन करावा लागल्याच्या घटना बऱ्याचदा पाहायला मिळतात. स्वतःच्या फायद्यासाठे अनेकदा सरकारी अधिकारी नियम धाब्यावर बसवतात. असाच एक संतापजनक प्रकार छत्तीसगड येथे समोर आला आहे.

एका अन्न निरीक्षक आधिकाऱ्याने त्याचा पाण्यात पडलेला महागडा मोबाईल परत मिळवण्यासाठी बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी उपसल्याचा प्रकार समोर आला आहे. एका फोनच्या निमित्तानं त्याने तब्बल दीड हजार एकर शेतीस पुरेल एवढं पाणी वाया घालवल्याने संताप व्यक्त केला जात आहे. महत्वाचं म्हणजे हे पाणी उपसल्यानंतर आधिकाऱ्याला त्याचा महागडा फोन सापडला, मात्र तो तेव्हा खराब झाल्याचं आढळून आलं.

food inspector pumped lakhs of liters water from dam for his expensive mobile phone in chhattisgarh
9 Years Of Modi Government : नऊ वर्षात घेतलेल्या 'या' निर्णयांमुळे आजही मोदींना हरवणं जवळपास अशक्य; वाचा सविस्तर

छत्तीसगड मधील कांकेरच्या कोयलीबेडा ब्लॉकचे अन्न अधिकारी रविवारी सुट्टी घालवण्यासाठी खेरकट्टा परळकोट जलाशय येथे पोहोचले होते. खेरकट्टा पर्लकोट जलाशयाच्या ओव्हर ब्रिजवर १५ फुटांपर्यंत भरलेल्या बंधाऱ्यात या आधिकाऱ्याचा महागडा स्मार्टफोन पडला.

या आधिकाऱ्याने मोबाईल शोधण्याच्या कामात गावातील लोकांना लावलं. अनेकांनी प्रयत्न करून देखील मोबाईल सापडला नाही. यानंतर फोन बाहेर काढण्यासाठी सिंचन विभागाच्या आधिकाऱ्यांशी बोलणी करण्यात आली. यानंतर ३० एचपीचा पंप लावून जलाशयातील पाणी बाहेर उपसण्यात आलं. पाणी काढण्यासाठी तीन दिवस पंप चालू होता.

food inspector pumped lakhs of liters water from dam for his expensive mobile phone in chhattisgarh
Mukesh Ambani : नातवंडांचे लाड पुरवायला अंबानींनी विकत घेतली थेट चॉकलेट कंपनी! जिओ, MI नंतर मोठी बिझनेस डिल

पाणी उपसलं जात असल्याची बातमी समजताच सिंचन विभागातील आधिकारी देखील घटनास्थळी पोहचले. यानंतर पंप बंद करण्यात आला. यानंतर पुन्हा मोबाईलचा शोध सुरू झाला आणि अखेर मोबाईल सापडला. पण तो खराब झाला होता.

मिळालेलया माहितीनुसार मागील सोमवार ते गुरूवार सलग २४ तास ३० एचपीचे दोन डिझेल पंप वापरून तब्बल २१ लाख लीटर पाणी वाया घालवण्यात आलं. इतकं पाणी वापरून दीड हजार एकर जमीनीला पाणी देता आलं असतं.

food inspector pumped lakhs of liters water from dam for his expensive mobile phone in chhattisgarh
थंड डोक्याने खून करणारा तो आठ वर्षांचा सीरियल किलर आता कुठे आहे? जगाला हादरवून सोडणारी कहाणी

आता या घटनेनंतर त्या मोबईलमध्ये असं होतं तरी काय असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. तसेच या प्रकरणी पाच फूट पाणी उपसण्याची तोंडी परवानगी देण्यात आली होती. मात्र १० फूट पाणी जास्त उपसण्यात आले. दरम्यान या महागड्या फोनची किंमत परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या उपजीविकेपेक्षा मोठी होती का? कडाक्याच्या उन्हाळ्यात मौल्यवान पाणी का वाया घालवण्यात आलं असा प्रश्न विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.