Food Poisoning in Buldhana: धक्कादायक! बुलढाण्यात महाप्रसादातून ५०० हून अधिक जणांना विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरु, काहींची प्रकृती चिंताजनक

Food Poisoning In Buldhana: विषबाधा झालेल्यांपैकी 100 ते 120 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर अद्याप 400 जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये काही वृद्ध नागरिकांचाही समावेश असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
Food Poisoning in Buldhana
Food Poisoning in BuldhanaEsakal
Updated on

बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुलढाण्यातील लोणार तालुक्यामध्ये सोमठाणा गावामध्ये काल(मंगळवारी) एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर महाप्रसाद ठेवण्यात आला होता. त्यामधून जवळजवळ ५०० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (Latest Marathi News)

कार्यक्रमानंतर महाप्रसाद म्हणून भगर आणि आमटी सर्व भाविकांना देण्यात आली होती. मात्र, भगर आणि आमटी खाल्ल्यानंतर अनेकांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. अंदाजे 450 ते 500 जणांना या जेवणातून विषबाधा झाली असून, त्यांच्यावर बिबी, लोणार, मेहकर, सिंदखेड राजा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचानक इतक्या जणांना हा त्रास सुरू झाल्याने परिसरात खळबळ उडाली.

Food Poisoning in Buldhana
Latest Marathi News Update: देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या

विषबाधा झालेल्यांपैकी 100 ते 120 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर अद्याप 400 जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये काही वृद्ध नागरिकांचाही समावेश असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. रात्री विषबाधेच्या प्रकारानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स गैरहजर असल्याने गावकऱ्यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Food Poisoning in Buldhana
Maratha Reservation : मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण; राज्य विधिमंडळाची विधेयकावर मोहोर

खापरखेड सोमठाणा तालुका लोणार येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपवासाच्या फराळाचे प्रसाद वाटप करण्यात आले होते. हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लोकांना प्रचंड वेदना आणि त्रास होण्यास सुरूवात झाली. अनेकांना उलट्या, पोटदुखी व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे खळबळ उडाली. पोलीस आणि महसूल प्रशासनाला या घटनेची माहिती होताच घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांना विषबाधा झालेल्या ग्रामस्थ महिला आणि पुरूषांना मिळेल त्या वाहनाने ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आलं. (Marathi Tajya Batmya)

मिळालेल्या माहितीनुसार, या ग्रामीण रूग्णालयात बेड उपलब्ध नसल्यामुळे रूग्णांना जमिनीवर झोपवून उपचार देण्यात आले. पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहेत.

Food Poisoning in Buldhana
Sharad Pawar: शाहू महाराजांना कोल्हापुरातून लोकसभेची उमेदवारी देणार का?; शरद पवार म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.