नवी दिल्ली : बेकायदा वाळू उत्खनन(Illegal sand mining )प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) पंजाबमध्ये आज विविध ठिकाणांवर छापे(rade) घातले. राज्य सरकारने वाळू माफियांविरोधात कारवाईचा फास आवळला असून आजची कारवाई ही त्याच शृंखलेतील भाग मानली जाते. चंडीगड(Chandigarh) आणि मोहालीतील दहा ते बारा ठिकाणांवर कारवाई करण्यात आली असून यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचे नातेवाईक भूपिंदरसिंग ऊर्फ हनी यांच्या कार्यालयाची तपाससंस्थांकडून झाडाझडती घेण्यात आली. विरोधकांनी याआधीच चन्नी आणि हनीसिंग यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप केला होता.
या ताज्या कारवाईबाबत बोलताना चन्नी म्हणाले की,‘‘ मतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी तपास यंत्रणा सहकारी मंत्र्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू लागली आहेत. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना ममता बॅनर्जी यांच्या नातेवाइकांना लक्ष्य करण्यात आले. आता नेमका तोच पॅटर्न पंजाबमध्ये देखील पाहायला मिळत आहे. राज्य सरकारवर सर्वच बाजूंनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
केवळ मंत्र्यांवरच नाही तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर देखील दबाव आणला जातो आहे. हे अशाप्रकारचे वातावरण लोकशाहीसाठी घातक आहे पण आम्ही सर्वप्रकारच्या दबावांना सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. आम्ही प्रचार सुरू ठेवू ते कधीही कुरघोडी करण्यात यशस्वी होणार नाहीत.’’‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांनी २०१८ मध्ये या अनुषंगाने एफआयआर दाखल केला होता. चन्नी यांच्या नातेवाइकांच्या कंपन्या बेकायदा वाळू उत्खननामध्ये सहभागी असल्याचे उघड झाले होते.
अवैध वाळूउपसा प्रकरणी चन्नींच्या पुतण्यावर छापा
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचे पुतणे भूपिंदरसिंग ऊर्फ हनी यांच्या मालमत्तांवर मंगळवारी सकाळी छापे टाकण्यात आले. अवैध वाळूउपसाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ही कारवाई केली. याप्रकरणी मनी लाँडरिंगचा खटला भरण्यात आला आहे. पहिला छापा हनी यांच्या होमलँड हाईट््स या घरावर टाकण्यात आला. त्यावेळी घरासमोर मोठी गर्दी जमली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले.
राज्यात एकूण दहा ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. कारवाई संपल्यानंतर याबाबतचे निवेदन जारी करण्यात येईल असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. चन्नी हे स्वतःच्याच मतदारसंघात अवैध वाळूउपसा प्रकरणात सामील असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी अनेक वेळा केला आहे. यात प्रामुख्याने आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी टीकेची झोड उठविली आहे. अवैध वाळूउपसा रोखण्यासाठी चन्नी काहीच कारवाई करीत नसल्याचा केजरीवाल यांचा आरोप आहे.
काँग्रेस पक्ष(congress party) चन्नी, पंजाब (punjab election)आणि पंजाबियतच्या बाजूने आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा १५ मिनिटे अडकून पडला होता. त्यांच्या सभेला केवळ ७०० लोक असल्यामुळे सभा रद्द करावी लागली होती, याला मुख्यमंत्री चन्नी(cm channi) जबाबदार आहेत का? पंतप्रधानांचा ताफा रोखला जातो तेव्हा बचावासाठी अरविंद केजरीवाल चन्नी सरकारवर आरोप करतात. आताही ‘ईडी’चे छापे झाल्यानंतर पहिले वक्तव्य केजरीवाल(arvind kejriwal) यांचे आले आहे. मोदींची हॉटलाईन केजरीवाल यांच्याशी जोडलेली असावी.
- रणदीप सुरजेवाला(randeep surjewala),
काँग्रेस सरचिटणीस
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.