Chhattisgarh Election: देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच छत्तीसगडमधील १२० हून अधिक नक्षलग्रस्त गावे ही त्यांच्या स्वतःच्याच गावात मतदान करणार आहेत. निवडणूक आयोगाच्या वतीने या गावांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून मतदानाची तयारी करण्यात येत आहे
नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावांत यंदा प्रथमच मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सुरक्षा दलांनी अथक परिश्रम घेऊन बस्तर भागातील परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणल्याचे आणि येथे लोकशाही अधिक मजबूत केल्याचे हे द्योतक असल्याचे मानले जात आहे.
बस्तर विभागामध्ये सात जिल्हे असून विधानसभेचे १२ मतदार संघ आहेत. सात नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानात येथील १२६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
गेल्या ६५ वर्षापेक्षा अधिक काळ छत्तीसगडमधील बस्तर विभागातील अनेक गावे नक्षलग्रस्त असल्याने या गावांतील नागरिकांना मतदानासाठी आठ-दहा किलोमीटरचे अंतर पायी कापत डोंगर-दऱ्या, नद्या ओलांडत अन्य गावांमध्ये मतदानासाठी जावे लागत होते. त्यामुळे या गावांतील नागरिकांना निवडणुकीच्या 'राष्ट्रीय उत्सवात' कधीही उत्साहाने सहभागी होता आले नाही.
यापूर्वी या भागाची दुर्गमता आणि नक्षलवाद्यांकडून देण्यात येणाऱ्या धमक्यांमुळे बस्तर विभागातील अनेक गावांत मतदान केंद्रे सुरू करता येत नव्हती असे पोलिसांनी सांगितले. मात्र मागील पाच वर्षांपासून येथील नक्षलग्रस्त भागात केंद्र आणि राज्यातील सुरक्षा दलाच्या छावण्या स्थापन करण्यात आल्याने येथील नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे.
एकेकाळी नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बस्तर विभागातील १२६ ठिकाणी यंदा पहिल्यांदाच मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही नवी मतदान केंद्रे येणाऱ्या पिढ्यांना 'बुलेट'वर 'बॅलेट'ने कशापद्धतीने यश मिळवले याची यशोगाथा सांगतील.
•सुंदरराज पी., पोलिस महानिरीक्षक, बस्तर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.