Forced Religious Conversion: सक्तीचे धर्मांतर रोखण्यासाठी काय करताय? सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल

forced religious conversion is a very serious issue says supreme court directed modi govt
forced religious conversion is a very serious issue says supreme court directed modi govt sakal
Updated on

सक्तीच्या धर्मांतरावर सर्वोच्च न्यायालयाने अतिशय कडक शब्दात टीका केली आहे. सक्तीचे धर्मांतर हा अतिशय गंभीर मुद्दा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्याचा देशाच्या सुरक्षेवर आणि धर्म स्वातंत्र्यावरही परिणाम होत असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. एवढेच नाही तर सक्तीचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र सरकार काय करत आहे, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. यासोबतच बेकायदेशीर धर्मांतराचा कायदा करण्याच्या मागणीबाबत 22 नोव्हेंबरपर्यंत उत्तर मागवण्यात आले आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख 28 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.

केंद्राने प्रतिज्ञापत्र दाखल करावे

या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती एमआर शाह आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठात सुरू आहे. सुनावणीदरम्यान सरकारच्या वतीने उत्तर देताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आदिवासी भागातील धर्मांतराबद्दल बाजू मांडली, त्यावर न्यायालयाने विचारले की अशा प्रकरणांमध्ये सरकार काय करत आहे? या प्रकरणी राज्यांमध्ये कायदे असू शकतात, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मात्र या प्रकरणी केंद्र काय करत आहे हे जाणून घ्यायचे असल्याचे न्यायलायाने म्हटले आहे. खंडपीठाने बळजबरीने धर्मांतराच्या विरोधात केंद्र सरकारने उचललेल्या 22 पावलांची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र मागवले आहे.

हेही वाचा : मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

forced religious conversion is a very serious issue says supreme court directed modi govt
Ketaki Chitale: केतकीची थेट कंगनाशी तुलना, ठाकरे गटातील नेत्याने म्हटलं...

याचिकेवर सुनावणी सुरू

विशेष म्हणजे देशात जबरदस्तीने धर्मांतराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्याचवेळी धमकावण्यासोबतच पैशाचे आमिष दाखवून देशात लोकांना धर्मांतरित केले जात असल्याचा दावा वेगवेगळ्या संघटना करत आहेत. दिल्ली भाजप नेते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी या संदर्भात याचिकाही दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

forced religious conversion is a very serious issue says supreme court directed modi govt
Jitendra Awhad: आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आठवडाभरात दुसरा गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.