Kolkata : महिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं २ किलो सोनं; पाहून पोलिसही चक्रावले!

तिच्या शरीरात आणखीही बऱ्याच प्रमाणात सोनं असल्याचं आढळून आलं आहे.
Gold
GoldSakal
Updated on

कोलकत्त्यातल्या नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करत असताना पोलिसांना एका महिलेकडे २ किलो सोनं सापडलं आहे. हे सोनं बॅग किंवा खिशात नसून चक्क तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आढळून आलं आहे. हा धक्कादायक प्रकार पाहून पोलिसही चक्रावले आहेत.

कोलकत्त्यातल्या या विमानतळावर सीमाशुल्क विभागाचे अधिकारी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करत होते. त्यावेळी एका परदेशी महिलेचं वागणं सुरक्षारक्षकांना संशयास्पद वाटतं. म्हणून त्यांनी तिची झडती घेतली. तेव्हा हा धक्कादायक प्रकार या अधिकाऱ्यांसमोर उघडकीस आला. या महिलेने आपल्या अंतर्वस्त्रात आणि प्रायव्हेट पार्टमध्ये जवळपास २ किलो सोनं लपवलं होतं.

Gold
Tribal Girls : राजस्थानच्या आदिवासी मुलींची महाराष्ट्र, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी

सुदानवरुन परतलेल्या या महिलेकडून १ हजार ९३० ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं आहे. सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत ९६ लाखाहूनही अधिक आहे. सुदानची नागरिक असलेल्या लामिस शरीफ या महिलेची अधिकाऱ्यांनी झडती घेतली. तिची विचारपूस केल्यावर तिच्या उत्तरांमध्ये गोंधळ आढळल्याने त्यांना शंका आली. झडती घेतल्यावर महिलेच्या अंतर्वस्त्रात दोन पाकिटांमध्ये सोनं आढळून आलं.

Gold
बिबट्याच्या कातडीची तस्करी, रॅकेट उध्वस्त; अंबोली घाटात घडला थरार

तपास करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना या परदेशी महिलेच्या प्रायव्हेट पार्टजवळ सोन्याची पावडर आढळून आली. त्यामुळे अधिक तपास केला असा, तिच्या प्रायव्हेट पार्टमधून सोन्याच्या पावडरने भरलेल्या दोन कॅप्सूल्स आढळल्या. तिच्या शरीरात आणखी काही कॅप्सूल्स असल्याचं तिने अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. या महिलेला आता रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं असून तिची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.