अवघ्या 35 दिवसांत माजी आमदार चित्तरंजन शर्मा यांच्या चार नातेवाईकांना जीव गमवावा लागलाय
भाजपचे माजी आमदार चित्तरंजन शर्मा यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काका आणि पुतण्या यांच्या हत्येनंतर आता दोघा भावांची हत्या करण्यात आली आहे. बिहारच्या पाटणा येथे त्यांचे भाऊ शंभू शर्मा आणि गौतम शर्मा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अवघ्या 35 दिवसांत माजी आमदार चित्तरंजन शर्मा यांच्या चार नातेवाईकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे शर्मा यांच्या घरावर शोककळा पसरली आहे.
26 एप्रिल रोजी चित्तरंजन यांचे काका अभिराम शर्मा यांची जहानाबादमध्ये आणि पुतण्या दिनेश शर्मा यांची मसौधीमध्ये हत्या करण्यात आली होती. नीमा गावात वर्चस्वासाठी दोन गटांमध्ये गँगवॉर सुरू आहे. यामध्ये हत्येची प्रकरण समोर येत आहेत. या हत्येमागे प्रथमदर्शनी संजय सिंहचा हात असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या आरोपांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मानवजीत सिंह ढिल्लन यांनी दिली आहे.
दरम्यान, या घटनांमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ पसरली आहे. या घटनेत नीमा येथील पांडव टोळीचा मुख्य सूत्रधार संजय सिंह याचा हात असल्याची माहिती मिळत आहे. चार दिवसांपूर्वी संजय सिंह यांचा जवळचा सहकारी सुधीर शर्मा याची धनरुआ पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात माजी आमदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचं नाव आलं नाही. याचा सूड घेण्यासाठी माजी आमदाराच्या दोन्ही भावांची हत्या करण्यात आली आहे.
भाजपाचे माजी आमदार चित्तरंजन शर्मा यांना पाच भाऊ आहेत. भावांमध्ये मृत शंभू शरण हा चौथा आणि गौतम पाचवा होता. आगमकुआन पोलिस स्टेशन हद्दीतील विजयनगरमधील देशरत्न पथ इथं त्यांचं घर आहे. शंभू हा चार्टर्ड अकाउंटंट होता. दिल्लीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो तिथेच सराव करत होता. पण लॉकडाऊनच्या काळात तो पाटण्याला आला. सध्या पीसी कॉलनीतील महेंद्रलोक अपार्टमेंटमध्ये त्यांचं कार्यालय आहे. यामध्ये गौतमनंही त्याला मदत केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.