DY Chandrachud: ''कशाची सुनावणी घ्यायची अन् कशाची नाही, हे एखादा पक्ष ठरवू शकत नाही'' उद्धव सेनेच्या आरोपांवर चंद्रचूड संतापले
Uddhav Thackeray: एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आरोपांना उत्तर दिलं. ते म्हणाले, माझं उत्तर अतिशय साधंसरळ आहे. पूर्ण वर्ष आम्ही अनेक महत्त्वाच्या आणि संवैधानिक प्रकरणांवर सुनावणी केली...
नवी दिल्लीः देशाचे माजी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने कुठल्या प्रकरणाची सुनावणी घ्यायची, हे एखादा पक्ष ठरवू शकत नाही.