कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; भाजपनं मुलाचंच तिकीट कापलं

BS Yediyurappa
BS Yediyurappaesakal
Updated on
Summary

देशातील काही राज्यांच्या निवडणुका पार पडल्या त्यात भाजपला चांगलं यश मिळालंय.

बंगळुरु : देशातील काही राज्यांच्या निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालंय. दरम्यान, कर्नाटकातही विधान परिषदेच्या सात (Legislative Council Election in Karnataka) जागांसाठी निवडणुका होणार असल्याचं जाहीर झालं होतं. त्यामुळं सध्या कर्नाटकात 3 जून रोजी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरू झालीय. भाजपकडून (Bharatiya Janata Party) आज मंगळवारी उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहेत, तर काँग्रेसकडूनही आपली यादी जाहीर करण्यात आलीय.

मात्र, यात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांचे पुत्र व भाजपचे उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र (B.Y.Vijayendra) यांनाच तिकीट नाकारण्यात आलंय. यामुळं भाजप नेतृत्वानं येडियुरप्पांना हा मोठा धक्का दिल्याचं मानलं जातंय. कर्नाटकात विधान परिषदेच्या सात जागांसाठी 3 जूनला निवडणूक होत आहे. यातील चार जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. या निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारी यादी जाहीर केली असून, यात माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Savadi), पक्षाच्या सरचिटणीस हेमलता नायक, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष चलवादी नारायणस्वामी आणि एस. केशवप्रसाद यांचा समावेश आहे. मात्र, यात येडियुरप्पांचे पुत्र विजयेंद्र यांचं नाव नाहीय.

BS Yediyurappa
'शरद पवारांच्या त्या सभेनं भाजपची सत्ता उलथवली याचा राज ठाकरेंना विसर'

मागील काही दिवसांपासून विजयेंद्र यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण, ऐनवेळी पक्ष नेतृत्वानं त्यांना तिकीट नाकारून येडियुरप्पांनाच धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या कोअर समितीनं (BJP Core Committee) विजयेंद्र यांच्या नावाची शिफारसही करून त्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली आहेत. येडियुरप्पांनी मागील वर्षी जुलै महिन्यात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मोठा प्रश्न भाजप नेतृत्वासमोर आहे. येडियुरप्पांना त्यांचे पुत्र व पक्षाचे उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यामुळे राजीनामा द्यावा लागल्याची चर्चा होती. तसेच, विजयेंद्र यांना नव्या मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आलं नव्हतं. येडियुरप्पांनी आग्रह धरूनही नेतृत्वानं विजयेंद्र यांना डावलले होतं. आता विधान परिषदेचं तिकीटही त्यांना नाकारण्यात आलंय. यामुळं येडियुरप्पा नाराज असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.