Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Akash Anand: पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी आणि डॉ.आंबेडकरांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी बसपाचे नेतृत्व सर्व प्रकारचा त्याग करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे त्या म्हणाल्या.
Mayawati And Akash Anand
Mayawati And Akash AnandEsakal
Updated on

सीतापूरमध्ये वादग्रस्त भाषण देणे बसपाचे राष्ट्रीय संयोजक आणि बसपा सुप्रीमो मायावती यांचे उत्तराधिकारी आकाश आनंद यांना महागात पडले.

मायावती यांनी मंगळवारी रात्री उशिरा आकाश आनंद यांना दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवरून हटवले. मायावती यांनी X वरील पोस्टमध्ये ही माहिती दिली. पोस्टमध्ये त्यांनी आकाश आनंद यांना अपरिपक्व नेता म्हटले आहे.

(Mayawati And Akash Anand)

सीतापूरमधील जाहीर सभेत आकाश आनंद यांनी भाजप नेत्यांची तुलना दहशतवाद्यांशी केली होती. तसेच, त्यांना जोडे मारा असे आकाश आनंद म्हणल्याची चर्चा होती.

आकाश आनंद यांच्या या वादग्रस्त भाषणानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये पक्षाच्या तीनही उमेदवारांची नावे होती. याला गांभीर्याने घेत बसपा सुप्रीमो मायावती यांनी आकाश आनंद यांच्या प्रचारावर बंदी घातली होती. असे असतानाही ते दिल्लीतील पक्ष समर्थक, विद्यार्थी, शिक्षक आदींशी संपर्क साधत राहिले आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करत राहिले.

Mayawati And Akash Anand
Rahul Gandhi : आदिवासींचे हक्क मोदी हिरावून घेतील; राहुल गांधी यांचा दावा

बसपाच्या प्रमुख मायावती यांनी मंगळवारी एक निवेदन जारी करून त्यांची राष्ट्रीय समन्वयक पदावरून हकालपट्टी केली.

मात्र, त्यांनी आकाश आनंदचे वडील आणि भाऊ आनंद कुमार यांना पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी पूर्वीप्रमाणेच जबाबदारी पार पाडण्यास सांगितले.

पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी आणि डॉ.आंबेडकरांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी बसपाचे नेतृत्व सर्व प्रकारचा त्याग करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे त्या म्हणाल्या.

Mayawati And Akash Anand
Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

कोण आहेत आकाश आनंद?

आकाश आनंद बसपा प्रमुख मायावती यांचे लहान भाऊ आनंद कुमार यांचा मुलगा आहे. आकाश यांनी लंडनमधील एका मोठ्या कॉलेजमधून एमबीएची पदवी मिळवली आहे. आकाश गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात सक्रिय होते, तरुणांना पक्षाशी जोडण्यासाठी आकाश यांनी नुकत्याच झालेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी स्वीकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.