पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांनी अखेर भाजपच्या (BJP) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्षाला रामराम केला. यापूर्वीच त्यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. यापूर्वी मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर (Uttpal Parrikar) यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून ते पणजीतून (Panaji) अपक्ष लढणार आहेत. यामुळं भाजपसाठी हा आणखी एक झटका मानला जात आहे. (Former Goa CM Laxmikant Parsekar quits BJP will contest independently)
पार्सेकर म्हणाले होते, "मी भाजपचा राजीनामा देणार असून अपक्ष निवडणूक लढवणार आहे. पक्षानं त्यांना यंदाच्या निवडणुकीत तिकीट नाकारल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला आहे. एएनआयशी बोलताना पार्सेकर म्हणाले, अनेक वर्षांपासून मी भाजपचा सदस्य आहे. पण पक्षानं आपल्याला गृहित धरलं आहे. पक्ष सोडण्यासाठी मी तयार आहे, तसेच मी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे"
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या गोवा भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिवंगत दिग्गज नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपनं पणजीतून तिकीट नाकारलं. त्यामुळं नाराज झालेल्या पर्रिकर यांनी बंड केलं असून भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर अरविंद केजरीवाल यांनी त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. तर शिवसेनेनं आपण उत्पल्ल पर्रिकर यांच्याविरोधात उमेदवार देणार नसल्याचं म्हटलं आहे. याद्वारे आपण दिवंगत मनोहर पर्रिकर यांना अनोखी श्रद्धांजली वाहणार आहोत, असं जाहीर करत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.