भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलु खेळाडू सुरेश रैनाच्या (Suresh Raina) वडील त्रिलोकचंद रैना (Trilokchand Raina) यांचं निधन झालं आहे. कर्करोगाशी सुरु असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. त्रिलोकचंद रैना हे लष्करात अधिकारी होते. गाझियाबाद येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. (Former India cricketer Suresh Rainas Father Passes Away)
त्रिलोकचंद रैना हे मुळ जम्मू काश्मीरमधील रैनावारी गावाचे रहिवासी होते. १९९० दशकात काश्मीरी पंडीतांवर झालेल्या हल्ल्यानंतर गाव सोडलं होतं. त्यानंतर ते मुरादनगरमध्ये स्थायिक झाले होते. त्यांना दिनेश आणि सुरेश ही दोन मुलं आणि दोन मुली आहेत. सुरेश रैनाने 3 एप्रिल 2015 रोजी प्रियंकासोबत लग्न केलं. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. काश्मिरी पंडित त्रिलोकचंद रैना यांनी आपल्या परिवारासाठी मोठा संघर्ष केला आहे. संगोपन करण्यासाठी खूप कष्ट केले.
रैनाने क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या वडिलांचा पगार कमी होता. अशा परिस्थितीत रैनाच्या क्रिकेट ट्रेनिंगचा खर्च भागवणंही वडिलांना कठीण जात होतं. मात्र वडिलांचा हा त्रासही नंतर दूर झाला. 1998 मध्ये रैनाला लखनऊच्या गुरु गोविंद सिंग स्पोर्ट्स कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.