नोकरीचा राजीनामा देऊन IPS अधिकाऱ्याचा केजरीवालांच्या 'आप' पक्षात प्रवेश

Former IPS officer Bhaskar Rao
Former IPS officer Bhaskar Raoesakal
Updated on
Summary

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भास्कर राव यांना पक्षाचं सदस्यत्व मिळवून दिलंय.

दिल्ली, पंजाब विधानसभेची निवडणूक एकहाती जिंकल्यानंतर आम आदमी पार्टीनं (Aam Aadmi Party) आपला मोर्चा आता गुजरात, कर्नाटकाकडं वळवलाय. गुजरात आणि कर्नाटक विधानसभेची निवडणूक (Karnataka Assembly Election) 2023 मध्ये होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकचे माजी आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या (Manish Sisodia) उपस्थितीत आप पक्षात प्रवेश केलाय.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भास्कर राव यांना पक्षाचं सदस्यत्व मिळवून दिलंय. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले, दिल्लीतील आप सरकारची (AAP) प्रतिमा देशभरात विखुरत आहे. त्याचाच परिणाम पंजाबमध्ये दिसून आला. पंजाबच्या निकालामध्ये जनतेनं अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला आपला कौल दिला होता, आता त्याची लाट दक्षिणेतही पाहायला मिळत आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी नोकरी सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केलाय. भास्कर राव काम पाहण्यासाठी नेहमी दिल्लीत येत असतं. भास्कर राव हे बंगळुरूचे पोलीस आयुक्त (Bangalore Police Commissioner) होते. जे काम नेत्यांना करायचं होतं, ते समाजहिताचं काम राव यांनी स्वत: केलं, असं सिसोदिया यांनी सांगितलंय.

Former IPS officer Bhaskar Rao
भाजप अखिलेशना मोठा धक्का देणार; काका शिवपालांना करणार थेट 'उपसभापती'

माजी आयपीएस अधिकारी भास्कर राव (Former IPS officer Bhaskar Rao) म्हणाले, मी 25 वेळी पोलिस नोकरी केलीय. शिवाय, सैन्यातही कामगिरी बजावलीय. मी दिल्लीत असताना एक दिवस टॅक्सी चालक मला शाळा दाखवायला घेऊन गेला आणि त्यानं दवाखानाही दाखवला. या काळात हे घडू शकतं यावर माझा विश्वासच बसत नव्हता. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा संघर्ष आणि जीवन पाहून मी प्रभावित झालो. कर्नाटकातील सामान्य माणसालाही बदल हवाय. पारंपरिक पक्ष आपण खूप बघितले आहेत. पक्ष गेले, पण व्यवस्था बदलली नाहीय. म्हणून, मी आम आदमी पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतलाय, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.