Video: शिवराज सिंहांनी कार्यकर्त्याच्या पायात घातले बूट! भाजप सत्तेत येण्यासाठी केला होता कठीण संकल्प

यामुळं अनेकांना आश्चर्य वाटलं असेल पण कारण ऐकलं तर कार्यकर्त्याच्या समर्पण भावनेचं कौतुक कराल.
Shivraj Singh Chauhan
Shivraj Singh Chauhan
Updated on

अनुप्पूर (मध्य प्रदेश) : भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या पायात माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी आपल्या हातानं बूट घातले. माजी मुख्यंमत्र्यांनी असं का केलंय? यामुळं अनेकांना आश्चर्य वाटलं असेल पण कारण ऐकलं तर कार्यकर्त्याच्या समर्पण भावनेचं कौतुक कराल. (Former madhya pradesh CM Shivraj Singh Chauhan wear shoes to Ramdas Puri)

नेमकं काय घडलंय?

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अनुप्पूर जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष रामदास पुरी यांच्या पायात आपल्या हातानं बूट घातले. याचं कारण म्हणजे पुरी यांनी सहा वर्षांपूर्वी एक संकल्प केला होता. त्या संकल्पाची पूर्तता झाल्यानं त्यांच्यातील समर्पण भावनेचा आदर राखण्यासाठी शिवराज सिंह यांनी ही कृती केली. (Latest Marathi News)

Shivraj Singh Chauhan
PoK Elections : पीओकेत राखीव जागांच्या शहांच्या घोषणेनंतर तिथं निवडणुका होतील का? परराष्ट्र मंत्यांनी स्पष्टच सांगितलं

रामदास पुरींनी काय केला होता संकल्प?

रामदास पुरी यांनी सहा वर्षांपूर्वी अर्थात सन २०१७-१८ मध्ये संकल्प केला होता की, जोपर्यंत मध्य प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता येत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही. पण आता नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. काँग्रेसच्या कमलनाथ सरकारचा पराभव करत भाजपनं पुन्हा मध्य प्रदेशात सत्ता स्थापन केली आहे. एकूनच रामदास पुरी यांच्या संकल्पाची पूर्तता झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.