MCD Election : काँग्रेसचे माजी आमदार आसिफ खान यांना अटक; भरसभेत पोलिसांना दिली होती धमकी

असिफ खान यांनी पोलिस कर्मचाऱ्याला सर्वांसमोर धडा शिकवण्याची धमकी दिली होती.
Asif Mohammad Khan
Asif Mohammad Khanesakal
Updated on
Summary

असिफ खान यांनी पोलिस कर्मचाऱ्याला सर्वांसमोर धडा शिकवण्याची धमकी दिली होती.

माजी आमदार आणि काँग्रेस (Congress) नेते आसिफ मोहम्मद खान (Asif Mohammad Khan) यांना एका व्हायरल व्हिडिओमध्ये एसआयसह दोन दिल्ली पोलिस (Delhi Police) कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय.

याप्रकरणी शाहीनबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे माजी आमदार आणि नगरसेवक आसिफ खान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आसिफ खान यांनी एका उपनिरीक्षकाला शिवीगाळ तर केलीच, पण त्याला मारहाणही केली. शिवाय, असिफ खान यांनी पोलिस कर्मचाऱ्याला सर्वांसमोर धडा शिकवण्याची धमकी दिली होती.

Asif Mohammad Khan
Bharat Jodo Yatra : खरगोनमधील भारत जोडो यात्रेत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा; काँग्रेसनं स्पष्ट केली भूमिका

आसिफ खान आणि त्यांच्या समर्थकांनी घेरलेल्या दोन पोलिसांनी आपला जीव वाचवून तेथून पळ काढला होता. आसिफ खान यांच्या या कृत्यानंतर त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आज त्यांना अटक करण्यात आली. आसिफ खान यांच्या कृत्यावर भाजपनंही जोरदार टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.