नवी दिल्लीः दिल्लीमधून धक्कादायक माहिती पुढे येत आहे. १९ वर्षांपूर्वी म्हणजे २००४ साली मृत पावलेल्या एका व्यक्तीच्या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरु केला होता. आता या प्रकरणात मोठा खुलासा झाला असून तो व्यक्ती जिवंत पोलिसांना सापडला आहे. या घटनेनंतर पोलिसदेखील चक्रावून गेले होते.
जिवंत सापडलेल्या व्यक्तीने स्वतःला मृत घोषित करुन मोठा कट रचला होता. आरोपी व्यक्ती माजी नौसेना कर्मचारी आहे. त्याला आता क्राईम ब्रँचने अटक केलीय. त्याचं नाव बालेश कुमार असल्याचं पुढे येत आहे. त्याचं गाव पत्ती कल्याण, समालखा, पानिपत (हरियाणा) आहे. त्याने २००४मध्ये स्वतःला कथित मृत घोषित केलं होतं. परंतु तो अजूनही जिवंत आहे.
आरोपी बालेश कुमार याच्याविरोधात दिल्लीतल्या बवाना ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल होता. शिवाय टिळकमार्ग पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हाही त्याच्यावर दाखल होता. या दोन प्रकरणांमुळे बालेश फरार होता. या प्रकरणी क्राईम ब्रँचने एफआयआर दाखल केला आहे. आरोपीविरोधात कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४७४ आणि १२० बी नुसार गुन्हा नोंद केलाय.
१ मे २००४ मध्ये बालेश कुमार राजस्थानच्या जोधपूरमध्ये होता. तिथे त्याने आपल्या ट्रकला आग लावली होती. त्या प्रकरणात दोन जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये बालेश कुमारचा समावेश असल्याचं सांगण्यात आलेलं होतं. त्यानंतर बालेश जिवंत राहिला आणि पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. आता मात्र त्याचा भांडाफोड झालेला आहे.
पकडल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी सुरू केली. त्याच्याकडून बनावट कागदपत्रे आणि खून, चोरी अशा गुन्ह्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासोबतच त्याला मदत करणारे कोण होते, हे शोधण्याचाही प्रयत्न सुरू आहे. इतकी वर्षे तो सर्वांना कसे चुकवत राहिला, याची चौकशी पोलिस करीत आहेत. तपासादरम्यान गुन्हे शाखेने सरकारी कार्यालयातून त्याच्या पेन्शनची माहिती मिळवली. त्यानंतर आरोपी बालेश कुमारची पत्नी त्याच्या पेन्शनचा लाभ घेत असल्याचे समोर आलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.