Atal Bihari Vajpayee: वाजपेयींना राष्ट्रपती करायचे होते पण..., जाणून घ्या का फेटाळला गेला प्रस्ताव

एनडीएने हा प्रस्ताव अटलबिहारी वाजपेयींसमोर मांडताच त्यांनी तो लगेच फेटाळून लावला. त्यावेळी त्यांचा कार्यकाळ दोन वर्षे शिल्लक होता.
Atal Bihari Vajpayee
Atal Bihari VajpayeeEsakal
Updated on

पंतप्रधान असताना अटलबिहारी वाजपेयी यांना राष्ट्रपती होण्याची ऑफर आली होती, पण यातून चांगला संदेश जाणार नाही, असे सांगत त्यांनी ही ऑफर नाकारली होती. वाजपेयींचे सल्लागार अशोक टंडन यांनी त्यांच्या पुस्तकात दावा केला आहे की, २००२ साली एनडीएने वाजपेयींना राष्ट्रपती बनवण्याचा आणि पंतप्रधानपदाची खुर्ची लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे सोपवण्याचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्यांनी हा प्रस्ताव फेटाळला होता.(Latest Marathi News)

वाजपेयींनी प्रस्ताव का फेटाळला?

वाजपेयींच्या कार्यकाळात 1998 ते 2004 या काळात पीएमओमध्ये सल्लागार राहिलेले ज्येष्ठ पत्रकार अशोक टंडन यांनी आपल्या पुस्तकात 'द रिव्हर्स स्विंग: कॉलोनियलिझम टू कोऑपरेशन'मध्ये लिहिले आहे की, एनडीएने जेव्हा अटलबिहारी वाजपेयींकडे प्रस्ताव ठेवला तेव्हा त्यांनी 'एखाद्या विद्यमान पंतप्रधानाने खुर्ची सोडून राष्ट्रपती झाल्यास भारतासारख्या लोकशाही देशात चांगला संदेश जाणार नाही आणि एक धोकादायक प्रथा सुरू होईल...' असं म्हटलं होतं.

Atal Bihari Vajpayee
Chandrayaan-3 : अमेरिकेलाही हवं होतं 'चांद्रयान-३'चं तंत्रज्ञान; इस्त्रो चीफनी सांगितला किस्सा

डॉ.कलाम यांचे नाव ऐकून सोनिया गांधी थक्क झाल्या होत्या

अशोक टंडन लिहितात की, त्यावेळी वाजपेयींच्या कार्यकाळात दोन वर्षे बाकी होती. त्यांनी काँग्रेस नेत्यांना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत चर्चेसाठी आमंत्रित केले. त्यांना भेटण्यासाठी सोनिया गांधी, प्रणव मुखर्जी, डॉ.मनमोहन सिंग आदी नेते आले. वाजपेयींनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे नाव समोर ठेवले तेव्हा त्या थक्क झाल्या. (Marathi Tajya Batmya)

टंडन लिहितात, “वाजपेयींनी डॉ. कलाम यांचे नाव घेताच संपूर्ण शांतता पसरली. काही सेकंदांनंतर, सोनिया गांधी यांनी मौन तोडले आणि म्हणाल्या, 'तुमच्या निवडीमुळे आम्हाला आश्चर्य वाटते...'

Atal Bihari Vajpayee
Nithari killing: निठारी हत्याकांडप्रकरणी सुरिंदर कोळी, मोनिंदर सिंह पंढेर निर्दोष; फाशी देखील रद्द

सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, आता आमच्याकडे डॉ.कलाम यांना पाठिंबा देण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. तरीही तुमच्या प्रस्तावावर एकदा पक्षांतर्गत चर्चा नक्की करू. अशोक टंडन पुढे लिहितात की एनडीएने डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना उमेदवार बनवताच मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पक्षाने सर्वप्रथम पाठिंबा दिला होता. खुद्द मुलायम सिंह म्हणाले होते, “डॉ. कलाम माझे आवडते आहेत.

Atal Bihari Vajpayee
Mizoram Election: मिझोराममध्ये पुन्हा येणार मिझो नॅशनल फ्रंटची सत्ता; झोरामथांगा यांनी व्यक्त केला विश्वास !

पीएमओमध्ये कोणाच्या नावाची चर्चा होती?

डॉ.कलाम यांच्या नावाची घोषणा होण्यापूर्वी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. एनडीए महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल डॉ.पी.सी. अलेक्झांडर यांना उमेदवार बनवू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. टंडन लिहितात की मी पीएमओमध्ये होतो. पंतप्रधान कार्यालयातील काही शक्तिशाली लोक डॉ. अलेक्झांडरच्या वैयक्तिक संपर्कात होते आणि त्यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देत होते. त्यांनी पंतप्रधान वाजपेयींसमोर असा युक्तिवाद केला की जर एनडीएने डॉ. अलेक्झांडरच्या रूपात एका ख्रिश्चनला उमेदवारी दिली तर सोनिया गांधी आणि यूपीएला पर्याय उरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.