Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Bibhav Kumar Detained : मालिवाल यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कुमार यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
Bibhav Kumar Detained
Bibhav Kumar Detainedesakal
Updated on

Bibhav Kumar Detained:

आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर मुख्यमंत्री निवासस्थानात झालेल्या हल्ल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर दिल्लीत राजकीय गोंधळ उडाला आहे. दरम्यान स्वाती मालीवाल प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी पीए विभव कुमार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली.

दिल्ली पोलिसांचे एक पथक आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते आणि बिभव कुमारला तेथून ताब्यात घेण्यात आले.

मालिवाल यांनी आरोप केला आहे की, जेव्हा ती मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरी गेली तेव्हा बिभवने त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांच्याविरोधात काउंटर केस दाखल केली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत बिभवने स्वाती मालीवाल यांच्यावरही अनेक आरोप केले आहेत.

मुख्यमंत्री केजरीवाल यांचे निकटवर्तीय बिभव कुमार यांनी शुक्रवारी ईमेलद्वारे दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे. यामध्ये बिभवने स्वत:ला निर्दोष घोषित करत स्वाती मालीवाल यांचा हेतू अरविंद केजरीवाल यांना हानी पोहोचवण्याचा असल्याचे म्हटले आहे.

पोलीस आता बिभवला रुग्णालयात नेणार असून काही वेळात त्याला अटक होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांना बिभव दिल्लीबाहेर नसून केवळ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित असल्याची माहिती मिळाली होती.

Bibhav Kumar Detained
RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिभव कुमारने दिल्ली पोलिसांना त्याच्या तक्रारीसंदर्भात पाठवलेल्या मेलचा आयपी ॲड्रेसही पोलिसांनी ट्रॅक केला होता. अनेक टीम सतत बिभवचा शोध घेत होती आणि अखेर विभवला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आलं.

13 मे रोजी स्वाती मालीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली होती आणि तिने अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय बिभव कुमारवर गंभीर आरोप केले होते. यानंतर त्यांनी एफआयआर दाखल करून शुक्रवारी न्यायालयासमोर आपला जबाब नोंदवला. ज्यामध्ये बिभववर गंभीर आरोप करण्यात आले होते. गुन्हा दाखल केल्यानंतर दिल्ली पोलीस विभवला अटक करण्यासाठी त्याच्या ठिकाणाचा सतत तपास करत होते.

Bibhav Kumar Detained
Swati Maliwal: स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video समोर, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हात धरून नेले, अन्....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.