Video: अमित शाह रागवत नव्हते तर.... माजी राज्यपालांनी सांगितलं त्या दिवशी स्टेजवर काय घडलं?

Tamilisai Soundararajan On Amit Shah: अमित शाह रागावले होते आणि ते माजी राज्यपालांना काही तरी सुनावत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत होतं.
Amit Shah Tough Talk
Amit Shah Tough Talk
Updated on

नवी दिल्ली- तेलंगणाच्या माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यातील 'गंभीर' संभाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये अमित शहा तमिलिसाई यांच्यावर भडकल्याचं पाहायला मिळालं होतं. अमित शाह रागावले होते आणि ते माजी राज्यपालांना काही तरी सुनावत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत होतं. मात्र, याबाबत आता तमिलिसाई यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तामिळनाडू भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचा तर्क लावला जात होता. या प्रकरणी राजकीय वर्तुळात चर्चा होत असताना तमिलिसाई सुंदरराजन यांनी या घटनेबाबत खुलासा केला आहे. शिवाय, सर्व दाव्यांना फेटाळून लावलं आहे. अमित शाह मला रागवत नव्हते, असं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांनी यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.

Amit Shah Tough Talk
Amit Shah News : ...अन् अमित शहांचे नाव ‘एफआयआर’मधून वगळले; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

तमिलिसाई या म्हणाल्या की, ''बुधवारी, लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा अमित शाह भेटले होते. त्यांनी मला निवडणुकीनंतर करण्यात येणारी कार्यवाही आणि यासंदर्भातील आव्हानांबाबत विचारणा केली. मी त्यांना याबाबत सविस्तर सांगत होते, पण वेळेची कमी असल्याने त्यांनी मला राजनैतिक आणि मतदारसंघामध्ये अधिक गांभीर्याने काम करण्याचा सल्ला दिला. माझ्यासाठी हे खूप समाधानाचे होते. त्यामुळे जे काही दावे होत आहेत, ते मी फेटाळून लावते.''

तामिळनाडूमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी राज्यात चांगलाच जोर लावला होता. पण, तरी भाजपला राज्यात यश मिळवता आले नाही. राज्यात तमिलिसाई आणि अन्नामलाई यांच्यामध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याच्या बातम्या बाहेर येऊ लागल्या होत्या.

तमिलिसाई यांनी मार्च महिन्यामध्ये तेलगणांच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी चेन्नई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. पण, त्यांना पराभव स्वीकाराला लागला होता. या सर्व पार्श्वभूमीवर अमित शाह आणि तमिलिसाई यांच्या तिखट संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात शाह तमिलिसाई यांना बोट दाखवून बोलत असल्याचं दिसतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.